हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : पुण्यात आपल्या हक्काच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी आम्ही घेऊन आलो आहोत. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (PMRDA) एकूण ८३३ फ्लॅट्ससाठी एका मोठ्या ऑनलाइन लॉटरीची घोषणा केली आहे. ही लॉटरी आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटक (EWS) आणि अल्प-उत्पन्न गट (LIG) घटकासाठी आहे. या लॉटरीची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीनेच होणार आहे. ज्यांना पुण्यात अगदी स्वस्तात मस्त घर खरेदी करायचं आहे त्यांच्यासाठी हि मोठी सुवर्णसंधी असणार आहे.
कोणत्या भागात किती घरे – Pune Housing
PMRDA च्या या योजनेंतर्गत पेठ क्रमांक १२ येथे एकूण ३४० घरे उपलब्ध आहेत. यामध्ये EWS श्रेणीसाठी ५५ घरे आणि LIG श्रेणीसाठी २८५ घरांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, पेठ क्रमांक १२ येथील EWS श्रेणीतील पात्र लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत (PMAY) २.५० लाख रुपयांचे अनुदान मिळणार आहे. याव्यतिरिक्त, उर्वरित ४९३ फ्लॅट्स पेठ क्रमांक ३०-३२ येथे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामध्ये EWS श्रेणीसाठी ३०६ फ्लॅट्स आणि LIG श्रेणीसाठी १८७ फ्लॅट्सचा समावेश आहे. Pune Housing
महत्वाच्या तारखा-
१५ डिसेंबर २०२५ ला सकाळी ११:०० पासून ऑनलाईन नोंदणी सुरू झाली आहे. २७ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५:०० पर्यंत अर्ज करता येणार आहेत. १९ डिसेंबर २०२५ ला दुपारी १२:०० वाजल्यापासून ऑनलाइन अर्ज आणि शुल्क स्वीकारण्यास सुरुवात होणार आहे. २७ जानेवारी २०२६ ला रात्री ११:५९ पर्यंत ऑनलाईन शुल्क तुम्ही भरू शकता. ११ फेब्रुवारी २०२६ ला सायंकाळी ७:०० वाजता स्वीकृत अर्जांची तात्पुरती यादी प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर १२ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ५:०० पर्यंत तात्पुरत्या यादीवर आक्षेप नोंदवता येणार आहे. १७ फेब्रुवारी २०२६ ला सायंकाळी ७:०० वाजता अंतिम यादी जाहीर होईल. २६ फेब्रुवारी, २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता ऑनलाइन लॉटरी सोडत निघेल. त्याच दिवशी सायंकाळी ६:०० वाजता यादी जाहीर करण्यात येईल.




