Pune Local : पुणे लोकलच्या वेळापत्रकात मोठा बदल

pune local
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Pune Local : पुणे लोकल ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. रेल्वे विभागाने मुंबई रेल्वे साठी उद्या दिनांक 11 फेब्रुवारी रोजी मेगाब्लॉक जाहीर केला आहे. तर पुणे (Pune Local) लोकलच्या वेळापत्रकात सुद्धा महत्वाचा बदल करण्यात आला आहे.

शिवाजीनगर ते लोणावळा दरम्यान दुपारच्या (Pune Local) वेळात ट्रेन पुन्हा एकदा सुरु केली आहे. कोरोना काळात ही ट्रेन रद्द करणयात आली होती. मात्र कोरोना काळानंतर पुन्हा एकदा दुपारी धावणारी लोणावळा ट्रेन ग्राहकांच्या आग्रहास्तव सुरु करण्यात आली आहे. याकरिता प्रवाशांनी आंदोलन देखील सुरु केले होते. त्यानंतर रेल्वे प्रशासनाकडून ही ट्रेन 31 जानेवारीपासून सुरु करण्यात आली. या लोकलला चांगला प्रतिसाद देखील मिळतो आहे. मात्र आता लोकलच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.

मध्य रेल्वेच्या पूर्व विभागाने (Pune Local) दिलेल्या माहितीनुसार दुपारच्या वेळेत धावणाऱ्या लोकल रविवार वगळता इतर सहा दिवस सुरू राहणार आहेत म्हणजेच रविवारी दुपारी लोकल धावणार नाही.

वेळापत्रकानुसार शिवाजीनगर येथून दुपारी बारा वाजून पाच मिनिटांनी लोकल (Pune Local) सुटते आणि लोणावळ्याला दुपारी एक वाजून वीस मिनिटांनी पोहोचते. तसेच लोणावळा येथून सकाळी साडेअकरा वाजता लोकल सुटते आणि 12:45 वाजता शिवाजीनगर येथे पोहोचते. म्हणजे शिवाजीनगर लोणावळा दरम्यान दुपारच्या वेळी दोन लोकल गाड्या सुरू आहेत. एक अप आणि एक डाऊन मार्गावर धावते. मात्र आता दुपारच्या कालावधीत धावणाऱ्या या दोन लोकल गाड्या रविवारी धावणार नाहीत याची प्रवाशांनी नोंद घ्यावी.