Pune Lok Sabha 2024 : धंगेकर पॅटर्नला मोहोळ भिडणार; ‘सबकी पसंत’च आव्हान कायम…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यात यंदा (Pune Lok Sabha 2024) तिरंगी लढत असणार आहे. भाजपकडून मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) , काँग्रेसकडून रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) तर वंचितकडून अनपेक्षिपणे लढतीत उतरलेले वसंत मोरे (Vasant More) . पुण्याच्या राजकारणात या ना त्या कारणाने ही तीन नावं नेहमीच चर्चेेत असल्याचं पहायला मिळालं. महापौर पदाचा कार्यभार सांभाळताना कोरोनाच्या काळातील कामं आणि त्यानंतर महाराष्ट्र केसरी स्पर्धा, विवीध सांस्कृतिक कार्यक्रम यांचं यशस्वी आयोजन करणाऱ्या मोहोळांचं पुण्यात एक वेगळं वलय आहे. तर कसब्याच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या पारंपारिक बालेकिल्ल्याला सुरुंग लावून आमदार झालेेल्या रविंद्र धंगेकर यांनी काँग्रेसला पुन्हा पुण्याच्या राजकारणात जिवंत ठेवलं. तर स्थानिक पदाधिकाऱ्यांशी मतभेद, उमेदवारीवरुन वाद झाल्याने पुण्याची पसंत, मोरे वसंत या टॅगलाईन खाली ज्यांंची ओळख आहे. ते पुण्यातील डॅशिंग नगरसेवक,कमी तिथं आम्ही या न्यायानेे जनतेेची काम करणारे आणि सोशल मीडियावर स्वत: चा वेगळा फॅनबेस असणारे वसंत तात्या मोरे या तीन तगड्या उमेदवारांमध्ये यंदाची ही निवडणूक पहायला मिळणार आहेे. काँग्रेसचा परंपरागत बाालेकिल्ला असणाऱ्या पुण्यात भाजपनं मोदी लाटेत बस्तान बांधलं. ते सलग दोन टर्म भाजपच्याच उमेदवारानं हे मैदान आरामशीर मारलं आहे. मात्र २०२४ ची लढत इंटरेस्टिंग आहे आणि तितकीच अनपेक्षित देखील. त्यामुळे मोहोळ आपला फायनल डाव टाकून कुस्ती जिंकणार? हु इज धंगेकर म्हणणाऱ्या भाजपला रविंद्र धंगेकर पुन्हा इंगा दाखवणार, की मोरेंच्या मदतीने वंचित फॅक्टर पुण्यात पुन्हा गेमचेंजर ठरणार? तेच जाणून घेऊया…

पुणे लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात. यामध्ये वडगाव शेरी, पर्वती, कोथरूड, कसबा पेठ, शिवाजीनगर, पुणे छावणी या विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचा एक आमदार, भाजपचे चार आणि काँग्रेसचा एक आमदार आहे. तसं पाहायला गेलं तर या मतदारसंघात भाजपचं वर्चस्व जास्त आहे. त्यामुळे ही लढाई काँग्रेससाठी सोपी नाहीये. माजी आमदार जगदीश मुळिक यांंची मनधरणी करुन, मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेवर पाठवून भाजपने पुण्याच्या उमेदवारीचा तीढा सोडवला. अन् माजी नगराध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांना लोकसभैच्या रिंगणात उतरवलं, खरतंर ब्राम्हण उमेदवार न दिल्यामुळे भाजपला कसब्याच्या पोटनिवडणुकीत मोठा फटका बसला होता म्हणूनच कुलकर्णी यांना राज्यसभेवर घेत काही प्रमाणात हा होईना भाजपनं ही नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. तर दुसरीकडे काँग्रेसने धंगेकर पॅटर्नवरच विश्वास कायम ठेवत, त्यांना तिकीट दिलं. त्यामुळे पुण्यात मोहोळ वर्सेस धंगेकर अशी दुहेरी फाईट होणार असं चित्र असताना या सगळ्या मल्टीड्राम्यामध्ये एण्ट्री झाली ती वसंत मोरे यांची… काहीही झालं तरी पुण्यातून निवडणूक लढवण्यास तात्या इच्छुक होते. मात्र पक्षानं तसा कोणताही निर्णय न घेतल्यानं नाराज झालेल्या मोरेंनी शरद पवारांपासून ते राऊतांपर्यंत सगळ्या नेत्यांच्या गाठीभेटी घेत उमेदवारी मिळेल का? याची चाचपणी केली. मात्र मविआकडून ही जागा धंगेकरांना सुटल्याने मोरेंनी वंचितची वाट धरली. ज्या अभिजित वैद्यांना तिकीट मिळावं, यासाठी वंचित अडून बसली होती. त्याच आंबेडकरांनी स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेेतल्यानंतर मात्र वसंत मोरेंना पुण्याच्या रिंगणातून पुढं केलं. त्यामुळे पुण्याची लोकसभा निवडणूक इंटरेस्टिंग वळणावर येऊन थांंबली आहे, असं म्हणायला सध्यातरी हरकत नाहीये..

Pune Lok Sabha मतदारसंघात तिरंगी लढत; Ravindra Dhangekar, Murlidhar Mohol की Vasant More कुणाचं वजन?

पुणे लोकसभेत सर्वात जास्त महत्वाचा ठरतो तो ब्राम्हण मतदारांचा टक्का. म्हणूनच प्रत्येकच पक्ष ब्राम्हण उमेदवाराला निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा प्रयत्न करायचा. यावेळेस मात्र हा फॅक्टर बाजूला सारून दोन्ही मुख्य पक्षांनी मराठा, ओबिसी नेतृत्वाला पुढे केलंं आहे. गिरीश बापटांच्या जाण्यानंतर पुण्यात होणारी ही पहिलीच लोकसभा असल्याने भाजपसाठी पुण्याची ही जागा प्रतिष्ठेचा मुद्दा असणार आहे. तर काँग्रेसही आपला हा जुना बालेकिल्ला पुन्हा खेचून आणण्यासाठी शक्यतो सर्व प्रयत्न करताना दिसेल. मोहोळ यांच्या एकूण राजकीय कारकिर्दीबद्धल बोलायचं झालं तर नगरसेवक पदापासून त्यांचा सुरु झालेला प्रवास हा महापौर पदापर्यंत येऊन पोहचला. स्थायी समिती, पीएमटी मध्येही पदभार सांभाळण्याची संधी मिळाल्याने संपूर्ण शहराच्या नाड्या त्यांनी जवळून पाहिल्या. कोरोनाच्या काळात मोहोळांनी केलेल्या कामाची संपूर्ण शहरात चर्चा झाली. महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं आयोजन आणि अनेक सांस्कृतिक कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यात त्यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे मुरलीधर अण्णा हे नाव पुण्यात प्रत्येकाच्या तोंडावर खेळू लागलं. बापटानंतर भाजपसाठी पुण्यातीस शांत, संयमी नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहीलं जात होतं.

फडणवीसांच्या अत्यंत जवळच्या गोटातील समजल्या जाणाऱ्या मोहोळ यांना खासदारकीचं तिकीट मिळणार, हे त्यामुळे जवळपास कन्फर्म होतं. झालंही तसंच मुरलीधर मोहोळ यांच्या नावावर भाजपने पुण्याच्या जागेवरुन शिक्कामोर्तब केला. दुसरीकडे मात्र रविंद्र धंगेकर यांच्या व्यक्तिमत्वाला कार्यक्षेत्राच्या मर्यादा आहेत. अनेक वर्ष आपल्या प्रभागात नगरसेवक म्हणून कामाचा ठसा उमटवणारे धंगेकर कसब्याच्या पोटनिवडणुकीच्या निम्मिताने लाईमलाईटमध्ये आले. भाजपची हक्काची जागा जिंकल्यामुळे धंगेकर हे नाव संपूर्ण महाराष्ट्राला परिचीत झालं. त्यामुळे कसबा आणि आसपासच्या परिसरात धंगेकर यांचं काम बोलत असतं. त्यांचा एक वेगळा फॅनबेसही आपल्याला इथं पहायला मिळतो. त्यात मोहोळ यांना महापौर म्हणून संपूर्ण पुणे शहरात कामाचा इम्पॅक्ट पाडता आला त्या तुलनेत धंगेकरांसाठी हा आउटरीच तसा कमी आहे. मात्र मविआची ताकद प्लस, धंगेकरांचा कसबा मतदारसंघ प्लस, अल्पसंख्यांक, मुस्लिम समाजाची व्होटबँक असं समिकरण मांडलं तर धंगेकर मोहोळांना तगडी फाईट देऊ शकतात. पुण्यात संघाचं केडर मोठं आहेे… पुण्यात बुथ लेव्हल पासून पक्ष संघटनेचं जाळंही भाजपने मजबूत बांधलंय… इतकंच काय तर मतदारसंघातील बहुतांश आमदारांची ताकद भाजपच्या बाजूने असणार आहे. त्यामुळे आता मतांचं गणित जुळवून आणत कोण कुणावर वरचढ ठरणार हे पाहणं इंटरेस्टींग असणार आहे…

पुण्यासाठी मोहोळ वर्सेस धंगेकर अशी सोपी लढत असताना त्यात वसंत मोरेंच्या एण्ट्रीनं मोठा क्लायमॅक्स आलाय. मनसेकडून यंदाची लोकसभा लढविण्यासाठी इच्छुक असणाऱ्या मोरेंना नेतृत्वाकडून मात्र पॉझिटीव्ह रिस्पाॅन्स मिळाला नाही. अखेर नाराज झालेल्या मोरेंनी वंचितचा झेंडा हाती घेत प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली पुण्याच्या लढतीत उडी घेतली. मोरेंनी या दुहेरी लढतीला तिरंगी बनवली. कारण पुण्यात मोरेंचा फॅनबेेस आहे. दक्षिण पुण्यात म्हणजेेच कात्रजच्या पट्टयात मोरंचं तगडं काम आहे. मुस्लिम, बहुजन अगदी सगळ्याच स्तरातील लोकं त्यांच्या पाठीशी असल्याचं पाहायला मिळतं. मोरे मनसेत नसले तरी मनसेचं त्यांनी बांधलेलं मोठं केडर त्यांना आतल्या गोटातून मदत करताना दिसेल. इतकंच काय तर वंचितला माणणारा एक मोठा वर्ग मोरेंना ताकद देणार असल्याने मोरे पुण्याला धक्कादायक निकाल देऊ शकतात. मोरे निवडून येतील की नाही, हे माहीत नाही. पण त्यांच्यामुळे होणाऱ्या मतविभाजनाचा फटका नेमका कुणाला बसणार? हे पाहणंही येत्या काळात महत्वाचं ठरणार आहेे.