Pune Longest Flyover : पुण्यातील सर्वात मोठा उड्डाणपूल; आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

Pune Longest Flyover
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Pune Longest Flyover गणेशोत्सवानिमित्त पुणेकरांना गुड न्यूज मिळाली आहे. पुण्यातील सर्वात मोठा उड्डाणपूल आज वाहतुकीसाठी सुरु होणार आहे. सिंहगड रस्त्यावर हा उड्डाणपूल उभारण्यात आला असून या पुलामुळे फनटाईम थिएटरहुन विठ्ठलवाडी हा प्रवास अधिक सुपरफास्ट होईल. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या उड्डाणपुलाचे उद्घाटन पार पडणार आहे. यावेळी नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह शहरातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी यांची उपस्थिती बघायला मिळेल.

कसा असेल नवीन उड्डाणपूल? Pune Longest Flyover

सिंहगड रस्त्यावर उभारण्यात आलेला हा पुण्यातील सर्वात मोठा उड्डाणपूल सुमारे २.५ किलोमीटर लांबीचा आहे. सप्टेंबर 2021 मध्ये या उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात झाली होती. आज हा प्रकल्प प्रत्यक्षात पुणेकरांसाठी साकार झाला आहे. पुलाचा पहिला टप्पा म्हणजेच राजाराम पूल चौकातील 520 मीटर लांबीचा भाग मागच्या वर्षी ऑगस्ट महिन्यात सुरू झाला. दुसरा टप्पा विठ्ठलवाडी ते फनटाईम मे 2025 मध्ये सुरू झाला होता. तर गोयल गंगा चौक ते इनामदार चौक असा तिसरा टप्पा संप्टेंबरमध्ये पूर्ण झाला. या संपूर्ण प्रकल्पासाठी तब्बल ११८ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे.

या दुहेरी उड्डाणपूलामुळे (Pune Longest Flyover) सिंहगड रोड आणि आसपासच्या भागात, धायरी, खडकवासला, वडगाव बुद्रुक, नांदेड शहर आणि मुंबई-बेंगळुरू महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्यांवरील गर्दी मोठ्या प्रमाणावर कमी होईल आणि परिणामी वाहतूक कोंडीही मिटण्याची शक्यता आहे. प्रवाशांचा प्रवास १५-२५ मिनिटांनी कमी होईल. खरं तर पुणे शहरातील सिंहगड रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी दूर व्हावी या हेतूनेच हा दुहेरी उड्डाणपूल तयार करण्यात आला आहे. पुण्यातील दळणवळण व्यवस्थेत हा प्रकल्प एक महत्त्वाची भूमिका निभावेल

मंत्री माधुरी मिसाळ यांनी या नव्या उड्डाणपुलाबद्दल माहिती देताना म्हंटल कि, पुणे हे महाराष्ट्रातील सर्वात वेगाने वाढणारे शहर आहे. पुण्यात लोकसंख्या आणि रस्त्यांवरील गाड्या या दोन्हीचीही संख्या वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर सिंहगड रोड वरील दुहेरी उड्डाणपूल (Pune Longest Flyover) सर्व वाहतुकीच्या अडथळ्यांना तोंड देण्यासाठी एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या उड्डाणपुलामुळे दररोज हजारो प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. तसेच पुण्याच्या पश्चिम कॉरिडॉरमधील निवासी आणि व्यावसायिक केंद्रांमधील कनेक्टिव्हिटी वाढेल.