Pune Mahanagarpalika Bharti 2024 : पुणे महानगरपालिकेत नोकरीची संधी; 113 पदांसाठी भरती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Pune Mahanagarpalika Bharti 2024। नोकरीचा शोध घेताय ? तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे, ती म्हणजे पुणे महानगरपालिकेत मेगा भरती सुरु झाली आहे. ही संधी मोठी असून इच्छुक उमेदवारांनी या भरतीसाठी त्वरित अर्ज करण्याची आवश्यकता आहे. आता ही नोकरीची भरती नेमकी कोणत्या पदांसाठी आहे काय अटी तसेच पात्रता आहे हे आज आपण जाणून घेऊया.

113 ज्युनिअर इंजिनिरसाठी भरती – Pune Mahanagarpalika Bharti 2024

पुणे महानगरपालिकेमध्ये सुरु असलेली भरती (Pune Mahanagarpalika Bharti 2024) स्थापत्य विभागाकडून राबविली जात असून या भरतीच्या माध्यमातून तब्बल 113 ज्युनिअर इंजिनिरच्या जागा भरल्या जाणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवार 16 जानेवारी 2024 पासून अर्ज करू शकतात. म्हणजेच आता तुम्हाला उशीर करून चालणार नाही. सदर भरती प्रक्रियेच्या 113 जागांपैकी 13 जागा या माजी सैनिकांसाठी आरक्षित आहेत. उर्वरित 100 जागा या सर्व प्रवर्गातील उमेदवारांसाठी ठेवण्यात आल्या आहेत. खास गोष्ट म्हणजे पुणे महानगरपालिकेकडून आयोजित केलेल्या या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला अनुभवाची कोणतीही अट ठेवण्यात आलेली नाही. ज्यांनी नुकतेच इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आहे, त्या उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज करू शकतात. सदर अर्ज तुम्हाला पुणे महानगर पालिकेच्या स्थापत्य विभाग कार्यालयात दाखल करावे लागतील.

2023 या वर्षी म्हणजे गेल्या वर्षी 135 कनिष्ठ अभियंत्यांची भरतीची प्रक्रिया महापालिकेने राबविली होती. त्यासाठी 3 वर्षांच्या अनुभवाची अट घालण्यात आली होती. मात्र असं असतानाही सुमारे 12 हजार 500 उमेदवारांकडून अर्ज प्राप्त झाले होते. यंदा मात्र अशा प्रकारची कोणतीही अट नसल्याने यावर्षीच्या भरती प्रक्रियेला उमेदवारांचा जास्त प्रतिसाद मिळण्याची शक्यता असल्याचे म्हटले जात आहे.