पुणेकरांसाठी खुशखबर! पंंतप्रधान नरेेंद्र मोदींच्या हस्ते पुणे मेट्रोचा शुभारंभ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रोचा शुभारंभ करण्यात आला आहे. त्यासोबतच विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण देखील मोदींच्या हस्ते करण्यात आले आहे. पिंपरीतील फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट मेट्रो सुरू होण्यासाठी पुणेकर डोळे लावून वाट पाहत होते. आज मात्र नरेंद्र मोदींच्या हस्ते या मेट्रोला हिरवा कंदील दाखविण्यात आला आहे. यावेळी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार असे अन्य नेते मंडळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना, पुणे देशाच्या अर्थव्यवस्थेला गती आणि तरुणांचं स्वप्न पूर्ण करणारे शहर आहे. पुण्यातील १५ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात आलं. हजारो कुटुंबांना घरे मिळाली आहेत. यासाठी मी पुण्यातील नागरिकांचे अभिनंदन करतो. पुण्यात पाच वर्षाच्या कालावधीत २४ किलोमीटर लांबीची मेट्रो सेवा सुरु झाली आहे. देशातील शहरात राहणाऱ्या लोकांचे जीवनमान उंचवण्यासाठी सार्वजनिक व्यवस्था बळकट करावी लागणार असल्याने नरेंद्र मोदींनी म्हणले आहे.

त्याचबरोबर, “आपल्याला भारतातील शहरात राहणाऱ्या लोकांचं जीवनस्तर चांगलं बनावायचं आहे, आपल्याला त्याला मोठ्या उंचीवर न्यायचं असेल तर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आधुनिक बनवावं लागेल. भारतातील अनेक शहरांत मेट्रोचा विस्तार होत आहे. नवनवे फ्लायओव्हर बनवले जात आहेत. रेड लाईट्सची संख्या कमी केली जात आहे. २०१४ पर्यंत भारतात २५० किमीपेक्षाही कमी मेट्रो नेटवर्क होतं. आता मेट्रो नेटवर्क वाढून ८०० किमी पेक्षाही जास्त झालं आहे” असेही मोदींनी सांगितले आहे.

याशिवाय, “सध्या १ किमी नव्या मेट्रो लाईनसाठी काम सुरू आहे. पाच शहरात मेट्रोचे निर्माण आज देशातील वीस शहरांत संचालित आहे. महाराष्ट्रातही पुणेशिवाय, मुंबई आणि नागपूरमध्ये मेट्रोचं विस्तार होत आहे. मेट्रो नेटवर्क आधुनिक भारताच्या शहरांची नवी लाईफलाईन बनत जात आहे. महाराष्ट्राचा विकास झाला तर भारताचा विकास होईल. भारताचा विकास झाला तर महाराष्ट्राचा विकास होईल” अशा शब्दात त्यांनी नविन मेट्रोसाठी शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, आज नरेंद्र मोदी पुण्यात लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्यानिमित्त आले होते. सर्वात प्रथम पुण्यात आल्यानंतर मोदींनी दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेतले. यानंतर ते पुरस्कार सोहळ्यासाठी रवाना झाले. यावेळी मोदींना राष्ट्रीय लोकमान्य टिळक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. त्यानंतर नरेंद्र मोदी पुण्यातील विकास कामांचे लोकार्पण आणि उद्घाटन करण्यासाठी रवाना झाले.