Pune Metro Line 3 च्या कामाला गती; 4 लाख प्रवाशांना होणार फायदा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पुणे शहरात सध्या  मट्रोच्या दोन लाईन पुणेकरांसाठी सुरु करण्यात आल्या आहेत. ह्या दोन्ही मेट्रो लाईनवर पुणेकरांकडून उत्स्फूर्त  प्रतिसाद मिळत आहे. त्यातच आता पुणे मेट्रोची हिंजेवाडी – माण लाईन -3 चे काम लवकर पुर्ण होऊन पुणेकरांच्या सेवेत येईल. पुण्याचे माजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या Pune Metro Line 3 हा आढावा घेतला आहे. हिंजेवाडी हे देशातील महत्वाचे आयटी पार्क आहे. पुणे शहरातून  ह्या भागात जाणाऱ्याची संख्या मोठी आहे. त्यामुळे ही मेट्रो लाईन सर्वात महत्वाची  आहे.

बैठकी दरम्यान मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी नमूद  केले की, ” पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माण-हिंजवडी ते शिवाजीनगर पुणे मेट्रो मार्गिका-३ मुळे हिंजवडी परिसरातील वाहतूक समस्या सुटण्यासोबत 4 लाख प्रवाशांना लाभ होणार असून या मेट्रो मार्गिकेच्या कामातील अडचणी दूर करण्यासाठी सहकार्य करण्यात येईल. या बैठकीवेळी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आयुक्त राहुल महिवाल, पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, पुणे आयटी सीटी मेट्रो रेलचे मुख्य कार्यकारी अधिकारी आलोक कपूर, पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर आदी उपस्थित होते

पुणे मेट्रो लाईन -3 चे  एकूण अंतर हे 24 km इतके असून ही मार्गीका पुर्ण करण्यासाठी 8313 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. ही मार्गीका पुणे शहरातील  शिवाजीनगर येथून सुरु होऊन विद्यापीठ मार्गे बाणेर, वाकड ते हिंजेवाडी ते माण पर्यंत बनवण्यात  येत आहे. पुणे मेट्रो लाईन -3 वर  एकूण  23 मेट्रो स्टेशन आहेत. यामध्ये मेगापोलिस सर्कल, अँबोसी क्वाड्रॉन बिझनेस पार्क, डोहलर, इन्फोसिस फेज II, विप्रो फेज II, पाल इंडिया, शिवाजी चौक, हिंजवडी, वाकड चौक, बालेवाडी स्टेडियम, NICMAR, राम नगर, लक्ष्मी नगर, बालेवाडी फाटा, बाणेर गाव, बाणेर, कृषिनगर , सकाळ नगर, विद्यापीठ, R.B.I., कृषी महाविद्यालय, शिवाजी नगर आणि दिवाणी न्यायालय या स्टेशनचा समावेश आहे.