Pune Metro : पुणेकरांसाठी लवकरच सुरु होणार Metro 4 आणि Metro 5?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पुणे मेट्रोच्या (Pune Metro) दोन प्रकल्पांची सुरुवात होऊन जवळ जवळ दीड महिना झाला आहे. पुणेकरांच्या पसंतीस पडणाऱ्या या मेट्रोने केवळ पुणेकरांचेच मन जिंकले नाही तर इतर ठिकाणचे लोक देखील केवळ मेट्रो कशी आहे हे पाहण्यासाठी जात आहेत. त्यातच आता मेट्रोच्या चौथ्या आणि पाचव्या मार्गाची चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे लवकरच पुणेकरांना आणखी गिफ्ट मिळू शकते.

तिसऱ्या मार्गांनंतर आता चौथा आणि पाचवा मार्ग होणार?

यापूर्वी 1 ऑगस्ट रोजी पंतप्रधान मोदींनी मेट्रोचे (Pune Metro ) उदघाटन केले आणि मेट्रो पुणेकरांच्या सेवेत रुजू झाली. तेव्हापासून मेट्रोची लोकप्रियता शहरात चांगलीच वाढत आहे. त्यातच आता मेट्रोचा तिसरा टप्पा असलेला शिवाजीनगर ते हिंजवडी लवकरच सुरु होणार असून त्याचेही काम वेगाने सुरु आहे. आता मेट्रोचा मार्ग अजून पुढे वाढवण्यासाठी त्याच्या चौथ्या आणि पाचव्या मार्गाचे काम सुरु होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

किती किलोमीटरचा आहे मेट्रो ३ मार्ग- 

शिवाजीनगर ते हिंजवडी या मार्गाचे काम वेगाने सुरु आहे. हा मार्ग 23 किलोमीट लांबीचा आहे. पहिला मार्ग हा 16.589 किलोमीटरचा होता. आणि दुसरा मार्ग हा 14 किलोमीटरचा आहे. त्यामुळे आता चौथा आणि पाचवा मार्ग कसा असेल ह्याकडे लक्ष आहे.

कसा असेल मेट्रो मार्ग 4 आणि 5- Pune Metro 

PMRDA म्हणजेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून मेट्रोचे तीन मार्ग पूर्ण झाल्यानांतर आता चार आणि पाच मार्गाचा विचार सुरु आहे. त्यामुळे पुण्याच्या सर्व मुख्य भागात मेट्रो वास्तव्य करणार अशी आशा व्यक्त केली जात आहे. एकूण 113.23 किलोमीटरचा हा मार्ग असणार आहे. मेट्रो लाईन चार हा शिवाजीनगर ते लोणी काळभार असा मार्ग असणार आहे. तर मेट्रो पाच मार्ग हा खडकवासला ते खराडी असणार आहे. PMRDA कडून या दोन्ही मार्गांचे प्रोजेक्ट रिपोर्ट दिल्ली मेट्रोकडून मागवण्यात आले आहेत .