Pune Metro : पुणेकरांची मेट्रोला तुंबळ गर्दी ; मेट्रोच बंद पडली , व्हायरल झाला व्हिडिओ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Pune Metro : मुंबईनंतर राज्यातील महत्वाचे शहर म्हणजे पुणे. पुण्यात शिक्षण, नोकरी, व्यवसायासाठी अनेकजण येत असतात. अशा या पुण्याची संख्या देखील काही वर्षात वाढली आहे. परिणामी पुण्याच्या सार्वजनिक वाहतुकींमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या सुद्धा वाढली आहे. बस आणि लोकल नंतर आता सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये मेट्रोचीही (Pune Metro) भर पडली आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी सोय होते आहे. मात्र रामवाडी मेट्रो स्टेशनला प्रवाशांची गर्दी वाढल्यामुळे मेट्रो बंद पडल्याची घटना घडली. त्यामुळे प्रवाशांची मात्र मोठी गैरसोय निर्माण झाली. याबाबतचा व्हिडीओ (Pune Metro) सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.

X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर piyushsocial नावाच्या खात्यावर प्रवाशांच्या गर्दीमुळे मेट्रो बंद पडल्याचे दोन व्हिडीओ पोस्ट करण्यात आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की,”ओव्हरलोडमुळे #पुणे स्टेशन ते रामवाडी मार्गावर मेट्रो बंद पडली” हा व्हिडीओ पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.शिवाय काही जणांनी वारीचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांमध्ये प्रवाशांची गर्दी वाढली असावी असा अंदाज व्यक्त केला आहे. तर पुणे मेट्रोला गर्दी पाहून पुणे मेट्रोची अवस्था मुंबई लोकल (Pune Metro) सारखी झाली आहे असे मत देखील व्यक्त केले आहे.

खरंतर रविवारी पुणे शहरांमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे आगमन झालं होतं त्यामुळे यासाठी काही महत्त्वाचे रस्ते बंद करण्यात आले होते. जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन रस्ता, वाकडेवाडी बस स्टॉप, स्वारगेट चा काही भाग या दिवशी बंद होता. त्यामुळे पुणेकरांनी मेट्रो वाहतुकीचा एक चांगला पर्याय असल्याने हा पर्याय स्वीकारला त्यामुळे अनेकांनी मेट्रो (Pune Metro) प्रवास करायला पसंती दिली असावी. दरम्यान काही प्रवासी पालखीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने पुण्यामध्ये आले असावेत असा अंदाज देखील व्यक्त केला जातो आहे.

मेट्रो नक्की बंद का पडली ? त्याबाबत मेट्रो (Pune Metro) प्रशासनाकडून कोणतीही माहिती समोर आलेली नाही दरम्यान मेट्रो बंद पडल्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला पण काही वेळानंतर मेट्रो सेवा सुरळीत सुरू करण्यात आली.