Pune Metro : कधी सुरु होणार पुणे मेट्रोचा महत्वाचा टप्पा ? अपडेट आली समोर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Pune Metro : मुंबईनंतर राज्यातील महत्वाचे शहर म्हणजे पुणे. पुण्यात शिक्षण, नोकरी, व्यवसायासाठी अनेकजण येत असतात. अशा या पुण्याची संख्या देखील काही वर्षात वाढली आहे. परिणामी पुण्याच्या सार्वजनिक वाहतुकींमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या सुद्धा वाढली आहे. बस आणि लोकल नंतर आता सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये मेट्रोचीही (Pune Metro) भर पडली आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी सोय होते आहे.

सध्या पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट म्हणजेच पर्पल मेट्रो लाईनचा पिंपरी चिंचवड महापालिका ते सिविल कोर्ट हा भाग वाहतुकीसाठी सुरू आहे. तसेच वनाज ते रामवाडी हा मार्ग देखील मेट्रोसाठी खुला करण्यात आले आहे. आता पुणेकरांना सिविल कोर्ट- स्वारगेट ही मेट्रो लाईन कधी सुरू होणार याची प्रतीक्षा लागून राहिली आहे. पुणेकरांची प्रतीक्षा संपणार आहे कारण लवकरच या मेट्रो मार्केटचे उद्घाटन होणार असून ही मार्गिका सुरू होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सुरुवातीला सिविल कोर्ट ते स्वारगेट पर्यंतची मेट्रो सेवा ऑगस्ट 2024 पर्यंत खुली केली जाणार असा दावा केला जात होता. या पार्श्वभूमीवर महा मेट्रोने देखील खूप प्रयत्न केले होते. पण तांत्रिक अडचणींमुळे हे काम लांबणीवर पडल्याचं कळतंय. यामुळे महा मेट्रो ने ठरवलेल्या वेळेत हा प्रकल्प सर्वसामान्यांसाठी सुरू होऊ शकला नाही. पण बांधकाम (Pune Metro) अंतिम टप्प्यात असून येत्या काही दिवसातच हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.

काशीपर्यंत सुरु होणार मार्गिका ? (Pune Metro)

लवकरच या प्रकल्पाचे काम पूर्ण होणार आहे असा अहवाल देखील अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेला आहे. महा मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकल्पाचे काम जवळपास पूर्णत्वास आले आहे. म्हणून महा मेट्रो ने मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त यांच्याशी संपर्क साधला असल्याची माहिती आहे. एवढेच नाही तर तीन स्थानकांसह संपूर्ण भागासाठी सुरक्षा तपासणीची सुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे. सप्टेंबरच्या मध्यापर्यंत हा मार्ग सुरू करण्यासाठी सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. गणेशोत्सवाच्या अखेरीस हा मार्ग वाहतुकीच्या सेवेत दाखल होऊ शकतो अशी अशा आता प्रवाशांना लागून राहिली आहे. त्यामुळे पुढच्या महिन्यात सिविल कोर्ट ते स्वारगेट हा संपूर्ण भूमिगत मेट्रो मार्ग (Pune Metro) पुणेकरांच्या सेवेत दाखल होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गिका (Pune Metro)

पुणेकरांसाठी आणखी एक महत्त्वाची बातमी म्हणजे स्वारगेट ते कात्रज अशी नवी मेट्रो लाईन बांधण्यासाठी केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. पुणे हे देशातील पाच मोठ्या महानगरांपैकी एक असून पुण्यातील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळांना मेट्रो लाईनचा विस्तार करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. या निर्णयानुसार स्वारगेट ते कात्रज अशी नवीन मेट्रोलाईन करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. 5.4 किलोमीटरचा हा प्रकल्प असणार आहे. यामध्ये तीन नवीन मेट्रोस्थानक असतील. या प्रकल्पाचा अंदाज हे खर्च 2954 कोटी रुपये असेल. हा (Pune Metro) प्रकल्प 2019 पर्यंत पूर्ण होण्याची (Pune Metro) शक्यता केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर सांगितली आहे.