Pune Metro : पुणे मेट्रोच्या नव्या मार्गिकेला पुणेकरांची पसंती ; स्वारगेट पर्यंत मेट्रो कधी ?

pune metro update
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Pune Metro : पुणे मेट्रोला पसंती मिळती आहे. मेट्रोच्या प्रवासी संख्येत सुद्धा वाढ झाली आहे. पुणे मेट्रोच्या रुबी हॉल ते रामवाडी स्थानक मार्गाला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. मेट्रो मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या आकडेवारीबाबत माहिती समोर आली आहे. त्यामुळे आकडेवारीवरून रुबी हॉल ते रामवाडी या मार्गावर प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे. प्रवासी संख्येच्या बाबतीत जानेवारी आणि मे महिन्याची तुलना केल्यास तब्बल नऊ लाखांची वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मेट्रोची सरासरी दैनंदिन प्रवासी संख्या आता नव्वद हजारांपर्यंत पोहोचली आहे. आता मेट्रो ही स्वारगेट पर्यंत कधी पोहोचणार असा प्रश्न असेल तर त्यासाठी मात्र प्रतीक्षा करावी लागणार आहे. स्वारगेट पर्यंत मेट्रो (Pune Metro) धावण्यासाठी सप्टेंबर पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

६ मार्च 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रुबी हॉल ते रामवाडी या विस्तारित मेट्रो (Pune Metro) मार्गीकेचे उद्घाटन दूरदृष्टी प्रणाली द्वारे केलं होतं. त्यानंतर मेट्रोच्या प्रवासी संख्येत वाढ होत आहे. रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी हा मार्ग सुरू होण्याआधी मेट्रोची प्रवासी संख्या जानेवारी महिन्यामध्ये 17 लाख 55 हजार, फेब्रुवारी महिन्यात 17 लाख 76 हजार आणि विस्तारित मार्ग सुरू झाल्यानंतर मात्र प्रवासी संख्या 22 लाख 58 हजार वर गेली आहे. तर एप्रिलमध्ये 23 लाख 81 हजार आणि मे महिन्यात 26 लाख 16 हजारांवर ही संख्या गेली आहे.

मेट्रोला 4 कोटींचे उत्पन्न

तर दैनंदिन प्रवासी संख्येच्या बाबतीत सांगायचे झाल्यास जानेवारी महिन्यात ही संख्या जवळपास 60,000 होती आणि रामवाडी पर्यंत विस्तारित मार्ग सुरू झाल्यानंतर दैनंदिन प्रवासी संख्या हे 90 हजारांवर पोहोचली विस्तारीत मार्ग सुरू होण्यापूर्वी मेट्रोची (Pune Metro) दैनंदिन उत्पन्न हे सुमारे दहा लाखांपर्यंत होते. तर विस्तारीकरण झाल्यानंतर मेट्रोचे दैनंदिन प्रवासी उत्पन्न हे 14 लाख रुपयांवर पोहोचला आहे. तर मे महिन्याच्या बाबतीत मिळालेल्या आकडेवारीनुसार मे महिन्यामध्ये 4 कोटी 24 लाख 76 हजार 480 रुपयांचे भरगोस उत्पन्न मिळाले आहे.

येरवडा स्थानक जुलैमध्ये सुरू होणार

येरवडा स्थानक जुलैमध्ये सुरू होणार असल्याची माहिती आहे. वनाझ ते रामवाडी मेट्रो मार्गावरील येरवडा स्थानकाच्या प्रवेशद्वाराचा एक जिना नगर रस्त्यात येत असल्याने महापालिकेने तो हलवण्यासाठी सांगितलं होतं. महामेट्रोकडून जिना दुसरीकडे हलवण्याचे काम सुरू झाले त्यामुळे या मार्गिकेवरील वरील सेवेतून येरवडा स्थानक सध्या वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्थानक जुलै महिन्याच्या आखेरीस सुरू होणार आहे. हे स्थानक सुरू झाल्यानंतर प्रवासी संख्येत आणखी वाढ (Pune Metro) होईल.