Pune Metro : पुण्यातील मेट्रो पुणेकरांच्या चांगलीच पसंतीस उतरत आहे. नव्याने सुरु झालेल्या स्वारगेट मेट्रोला देखील प्रवाशांची पसंती मिळत असून 1 ते 5 ऑक्टोबर दरम्यान, पीसीएमसी ते स्वारगेट मार्गावर 3.45 लाख प्रवाशांनी प्रवास केला आहे. पुण्यातल्या ट्रॅफिकला कंटाळलेले पुणेकर स्वस्तात आणि वेगवान प्रवास म्हणून मेट्रोचा पर्याय निवडताना दिसत आहेत. अशातच आता मेट्रोच्या पुढच्या टप्प्याचे उदघाटन कधी होणार (Pune Metro) याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे.
कारण हिंजवडी-शिवाजी नगर मेट्रो हा पुढचा टप्पा असून हिंजवडी आयटी पार्क मध्ये जाणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांना या मेट्रोचा फायदा होणार आहे. हिंजवडी-शिवाजी नगर मेट्रो सुरु झाल्यास मोठा दिलासा मिळणार आहे. हिंजवडी भागात कामासाठी ये-जा करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे अनेकदा या मार्गावर तासंतास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. मेट्रो सुरु झाल्यास ट्राफिक कमी होऊन पर्यायाने (Pune Metro) प्रवाशांचा वेळ वाचणार आहे.
कधी सुरु होणार हिंजवडी-शिवाजी नगर मेट्रो (Pune Metro)
सध्या शहरात हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो 3 मार्गाचे काम सुरू आहे. मेट्रो मार्गाचे किमान 70 टक्के काम पूर्ण झाले आहे. सप्टेंबरमध्ये उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी, शिवाजीनगर-औंध विभागातील सार्वजनिक व शासकीय सुटीच्या दिवशी गर्डर टाकणे व इतर बांधकामांना परवानगी देऊन कामाला गती देण्याचे निर्देश पोलिसांना दिले होते. पुढील वर्षी पुण्यातील हिंजवडी-शिवाजी नगर मेट्रो सुरु (Pune Metro) होऊ शकते.
पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) मॉडेल अंतर्गत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासाठी माणगाव ते हिंजवडी मार्गे शिवाजीनगर हा मेट्रो मार्ग विकसित करत आहे. याचे 99 टक्के भूसंपादन पूर्ण आणि 70 टक्के काम पूर्ण (Pune Metro) झाल्याने, हा बहुप्रतीक्षित मार्ग एप्रिल 2025 पर्यंत खुला होईल असे दिसते. या मार्गाची एकूण लांबी 23.203 किमी असून, त्यावर 23 स्थानके असतील.