Pune Mhada Lottery | पुण्यातील म्हाडा घरासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी आता ही एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आलेली आहे. ती म्हणजे आता पुणे गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळाच्या पुणे विभागातील 4877 घरांसाठी अर्ज करण्यासाठी आता पुन्हा एकदा मुदतवाढ केलेली आहे. उमेदवारांना 6 जून 2024 पर्यंत या घरांसाठी अर्ज करता येणार आहे. ज्यांनी अर्ज केले आहेत, त्यांना कागदपत्रे उपलब्ध व्हाव,m यासाठी ही मुदत वाढ करण्यात आलेली आहे. त्यामुळे येत्या गुरुवारपर्यंत देण्यात आलेल्या मुदतवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. येत्या 26 जून रोजी या घरांची सोडती होणार आहे. तीन महिन्यात 30 हजार जणांनी अर्ज केले होते.
म्हाडाच्या (Pune Mhada Lottery) वतीने मार्चमध्ये तब्बल 4877 घरांसाठी सोडत जाहीर करण्यात आलेली होती. परंतु लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू करण्यात आली होती. तरी देखील लोकांनी घरांसाठी नोंदणी सुरू केली होती. अर्ज करताना ऑनलाईन आवश्यक कागदपत्रे देखील अपलोड करावी लागतात. परंतु निवडणुकीमुळे आचारसंहिता लागल्याने आवश्यक कागदपत्र उमेदवारांना उपलब्ध होत नव्हती. त्यामुळे आता म्हाडाकडून ही मुदत वाढ करण्यात आलेली आहे.
म्हाडाला निवडणुकीचा फटका | Pune Mhada Lottery
म्हाडाच्या घरांची सोडत जाहीर केल्यानंतर लगेच लोकसभा निवडणुकांमुळे आचारसंहिता लागू करण्यात आली. त्यामुळे संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा निवडणुकीच्या कामांमध्ये व्यस्त होती. त्यामुळे ज्या उमेदवारांना म्हाडाचा अर्ज करताना उत्पन्नाचा दाखला, डोमोसाईल प्रमाणपत्र लागत होते. त्याची उपलब्धता वेळेवर झाली नाही. आणि लोकांना अर्ज देखील करता आलेला नाही. त्यामुळे म्हाडाला याबाबतचा मोठा फटका बसलेला आहे. परंतु आता उमेदवारांना या कागदपत्रांची पूर्तता करता यावी, यामुळे 6 जून पर्यंत अर्ज करण्याचा कालावधी वाढवलेला आहे.