Pune Mumbai Expressway : वाहतूक कोंडीतून सुटका ! पुणे-मुंबई महामार्गावर ‘या’ ठिकाणी बनणार नवा सर्व्हिस रोडमहाराष्ट्रातील दोन महत्त्वाचे शहर जोडणारा महामार्ग म्हणजे पुणे – मुंबई महामार्ग. दररोज या महामार्गावरून अनेकांची ये -जा होत असते. हा महामार्ग म्हणजे सर्वात व्यस्त असणाऱ्या महामार्गांपैकी एक आहे. त्यामुळे सहाजिकच येथे जाणाऱ्या प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. दरम्यान पुणे मुंबई महामार्गावर आता वाकड ते देहू रोड दरम्यान नवीन सर्विस रोड तयार होण्याची माहिती आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी या सर्विस रोड साठी (Pune Mumbai Expressway ) पुढाकार घेतलाय.
यापूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात बोलताना पुणे – मुंबई महामार्गाबद्दल (Pune Mumbai Expressway ) भाष्य केलं होतं. येथील होणारी वाहतूक कोंडी ही त्रासदायक असल्याचे त्यांनी म्हटलं होतं याशिवाय याबाबत ठोस उपाययोजना करणार असल्याचेही ते बोलले होते. येथील स्थानिकांच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या पाठपुरावाच्या पार्श्वभूमीवर गडकरी यांनी हा पुढाकार घेतला असून या ठिकाणी सर्विस रोड तयार झाला तर या भागातील कोंडी बऱ्यापैकी नियंत्रणात येईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
याशिवाय चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांनी देखील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान (Pune Mumbai Expressway ) या कामाचा उल्लेख केला होता. दरम्यान जगताप यांच्या पाठपुराव्यानंतर आता वाकड ते देहू रोड दरम्यान नवा सर्विस रोड तयार होणार आहे. पुढे बेंगलोर महामार्गावर वाकड ते देहू रोड दरम्यान 24 मीटर रुंदीचे नवीन सर्विस रोड तयार करण्याच्या प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती समोर आली आहे या मार्गावर दोन्ही बाजूचे सर्विस रोड तयार होणार आहेत.
दोन्ही बाजूने प्रत्येकी 24 मीटर रुंदीचा सर्विस रोड विकसित केला जाईल. हे सर्विस रोड पूर्ण झाल्यानंतर वाकड ते देहू रोड दरम्यान (Pune Mumbai Expressway ) होणाऱ्या वाहतूक कोंडी पासून नागरिकांची सुटका होणार असून नागरिकांचा वेळ वाचणार आहे.
याबाबत माहिती देताना आमदार जगताप यांनी निवडणुकीत दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत वाकड ते देहू रोड दरम्यान होणार आहे. या प्रकल्पामुळे नागरिकांना (Pune Mumbai Expressway ) होणाऱ्या अडचणी कमी होतील आणि परिसराच्या विकासाला चालना मिळेल यासाठी गडकरी यांच्या सहकार्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे असं म्हणत या प्रकल्पामुळे परिसराच्या विकासाला चालना मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे.