Pune-Mumbai Train: महत्वाची बातमी!! येत्या 28 मे ते 2 जूनपर्यंत पुणे ते मुंबई धावणाऱ्या ट्रेन रद्द

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Pune-Mumbai Train| रेल्वे प्रवाशांसाठी नुकतीच एक मोठी बातमी समोर आली आहे. येत्या 28 मे ते 2 जूनपर्यंत
पुणे-मुंबई मार्गे धावणाऱ्या दोन रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. म्हणजेच पुणे-मुंबई रेल्वेची सेवा तब्बल सहा दिवस बंद राहणार आहे. ज्यात पुणे ते मुंबई धावणारी डेक्कन क्वीन (Deccan Queen) आणि प्रगती एक्सप्रेस (Pragati Express) रेल्वेचा समावेश आहे. त्यामुळे आता याकाळात प्रवाशांचे अधिक हाल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काही तांत्रिक अडचणीमुळे काम सुरू करण्यात आल्याने रेल्वे प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्याच्या घडीला सीएसएमटीवर ही काम सुरू असल्यामुळे इतर अनेक रेल्वे सेवाही बंद आहे. यात मुंबई सीएसटी टर्मिनल प्लॉट 10 आणि 11 च्या विस्तारीकरणाचेही काम सुरू असल्यामुळे पुणे ते मुंबई धावणारी डेक्कन क्वीन आणि प्रगती एक्सप्रेसची सेवा बंद ठेवण्यात आली आहे. मात्र याकाळात काही गाड्या सीएसएमटी स्थानकाऐवजी दादरपर्यंत धावणार आहेत.

या सर्व गाड्या रद्द असतील (Pune-Mumbai Train)

महत्त्वाची बाब की, येत्या 28 मे ते 2 जून दरम्यान पुणे-मुंबई धावणारी पुणे प्रगती एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. तर
31 ते 2 जून दरम्यान, पुणे-मुंबई इंटरसिटी एक्सप्रेस बंद ठेवण्यात आली आहे. यात पुणे-मुंबई -पुणे एक्सप्रेस 31 ते 2 जून दरम्यान बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तर डेक्कन एक्सप्रेस 1 आणि 2 जून याकाळात रद्द असेल. यासह पुणे-मुंबई-पुणे डेक्कन क्वीन एक्सप्रेस 1 आणि 2 जून रोजी रद्द असेल. त्याचबरोबर, कुर्ला मडगाव कुर्ला या गाड्या 1 आणि 2 जून रोजी बंद असतील.