Pune Nagpur Expressway : पुण्याहून नागपूर गाठायचं सुसाट ! ‘हा’ रस्ता जोडला जाणार समृद्धी महामार्गाला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Pune Nagpur Expressway : पुणे ते नागपूर असा प्रवास करणाऱ्यांसाठी आता चांगली बातमी आहे. पुणे नागपूर प्रवास आता लवकरच केवळ सहा तासात पार करता येणार आहे. पुणे- अहमदनगर, संभाजीनगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी आणि वर्दळ लक्षात घेता हा रस्ता थेट मुंबई -नागपूर समृद्धी महामार्गाला जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Pune Nagpur Expressway) यांच्या उपस्थितीमध्ये दिनांक 8 मार्च रोजी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. याबरोबरच या कामाच्या भूसंपादनाच्या प्रक्रियेला वेग द्यावा असे निर्देश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहेत.

पर्यावरण पूरक प्रकल्प (Pune Nagpur Expressway)

मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकारच्या प्रस्तावानुसार जलद अंमलबजावणीसाठी हे काम महाराष्ट्र संस्कारची संस्था असलेल्या महाराष्ट्र इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कार्पोरेशन कडे सोपवण्यात आले आहे. या महामार्गासाठी 3752 हेक्टर (Pune Nagpur Expressway) जमीन आवश्यक असून एक्सप्रेस वे पर्यावरण पूरक नेट झिरो कार्बन आणि नेट पॉझिटिव ऊर्जा प्रकल्प म्हणून बांधला जाणार आहे. सात हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प असून लोकसभा निवडणुकीनंतर हा प्रकल्प मार्गी लागणार असल्याची माहिती समोर आली आहे.

पायाभूत सुविधांवर भर (Pune Nagpur Expressway)

याबाबत बोलताना नितीन गडकरी यांनी सांगितलं की नवीन ग्रीन फील्डचा (Pune Nagpur Expressway) विकास ६ लेन एक्सप्रेस वे 230 किलोमीटर रस्ता बांधकाम संदर्भात आज महामार्ग मंत्रालय आणि सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र यांच्यात सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या विकसनशील भारताच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पायाभूत सुविधांच्या जलदविकासावर या निमित्ताने भर दिला जाणार आहे.