पुणे- नाशिककरांसाठी खुशखबर!! 180 किमीचा 10 पदरी एक्सप्रेसवे होणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नाशिक ते पुणे दरम्यान 180 किमी लांबीचा एक्सप्रेस वे बांधण्याची महाराष्ट्र राज्य सरकारची योजना आहे. त्यामुळे या महामार्गावरून ये जा करणाऱ्यांचा प्रवास जलद गतीने होणार आहे. हा एक्स्प्रेस वे पुणे-मुंबई दरम्यानच्या हायवे रोडच्या धर्तीवर बांधला जाणार आहे.

701 किमी लांबीचा मुंबई-नागपूर समृद्धी मार्ग पूर्णत्वास येत असताना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र राज्य सरकार राज्यात पुणे आणि नागपूरला जोडणारा आणखी एक द्रुतगती मार्ग काढणार आहे. हा नियोजित एक्सप्रेस वे सुमारे 180 किमी लांबीचा असेल जो चिंबळीजवळील प्रस्तावित पुणे रिंग रोडपासून सुरू होईल आणि राष्ट्रीय महामार्ग-60 वर शिंदे येथे संपेल.

हा एक्सप्रेस वे पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड, नगर जिल्ह्यातील संगमनेर आणि नाशिक जिल्ह्यातील सिन्नरमधून जाईल. एक्सप्रेस वेच्या दोन्ही बाजूला पाच लेन असतील. मुंबई आणि पुणे आधीच एक्सप्रेस वेने जोडलेले आहे. त्यातच मुंबई नागपूर सम्रुद्धी महामार्गाच्या माध्यमातून मुंबई आणि नाशिकही जोडलेले आहे. आता पुणे नाशिक एक्सप्रेस वेच्या माध्यमातून जोडून मुंबई- पुणे- नाशिक हा त्रिकोणीय रस्ता तयार होईल.

या नव्या पुणे – नाशिक एक्सप्रेसवेवर फ्लाइट लँडिंग आणि टेकऑफ सुविधा असेल तसेच प्रत्येक 5 किमीवर आपत्कालीन टेलिफोन, पार्किंग आणि ट्रक बे, रुग्णवाहिका आणि टोइंग सुविधा, प्रत्येक 50 किमीवर विश्रांती क्षेत्र, फूड प्लाझा, ट्रॉमा सेंटर, आयटी पार्क यासह. एक्स्प्रेस वेच्या बाजूला शैक्षणिक संस्था. माहिती तंत्रज्ञान सेवांमध्ये विनामूल्य वाय-फाय प्रवेश, वाहतूक देखरेख आणि अंमलबजावणी, सीसीटीव्ही इत्यादींचा समावेश असेल.