हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Pune New Railway Line । पुणे म्हणजे विद्येचे माहेरघर…. शिक्षण आणि नोकरीनिमित्त भारताच्या कानाकोपऱ्यातून अनेकजण पुण्यात येतात आणि इथेच स्थायिक होतात. वाढत्या लोकसंख्येमुळे पुण्याच्या वाहतुकीवरील ताणही वाढला आहे. पुणेकरांना दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय. पुण्यात मागच्या काही काळात मेट्रो आली असली तरीही हा ताण म्हणावा तसा कमी होताना दिसत नाही. दुसरीकडे, पुणे रेल्वे जंक्शनवरही रेल्वेचा ताण आहेच… आता या कुणी सर्व पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणेकरांसाठी मोठी घोषणा केली आहे.
रिंग रोडला समांतर लोहमार्ग – Pune New Railway Line
अजित पवारांनी पुणेकरांसाठी नवा लोहमार्ग (Pune New Railway Line) जाहीर केला आहे, त्याचा रूट काय असेल हे सुद्धा सांगितलं आहे. लोहमार्ग तळेगाव दाभाडे ते चाकण, रांजणगाव मार्गे उरुळी कांचनपर्यंत असा हा लोहमार्ग असणार आहे. भोसरी येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका जाहीर सभेत अजित पवारांनी या रेल्वे प्रकल्पाची माहिती दिली. यावेळी अजित पवार म्हणाले, वर्तुळाकार (रिंग रोड) रस्ता केल्याशिवाय पुणे, पिंपरी-चिंचवडमधील वाहतूक कोंडी सुटू शकत नाही. रिंग रोडची निविदा काढली आहे. रिंग रोडला समांतर लोहमार्ग करावा लागणार आहे. तळेगाव दाभाडे ते चाकण रांजणगावमार्गे उरुळीकांचन असा लोहमार्ग केला जाणार आहे. रेल्वे प्रशासनाच्या तसे विचाराधीन आहे . हा मार्ग झाल्यास पुणे स्थानकावरील ताण काम होईल, असेही अजित पवार म्हणाले.
हा नवीन रेल्वेमार्ग (Pune New Railway Line) केवळ प्रवासी वाहतूकच नव्हे, तर चाकण आणि रांजणगाव येथील औद्योगिक विकासालाही चालना देणारा ठरेल . सध्या पुणे-लोणावळा आणि पुणे-दौंड मार्गावर क्षमतेपेक्षा अधिक गाड्या धावत आहेत, मात्र फलाट उपलब्ध नसल्यामुळे 72 गाड्यांना सिग्नलवर थांबावे लागते. ही समस्या दूर करण्यासाठी हा समर्पित रेल्वे मार्ग तयार केला जाणार आहे. रेल्वेशी समन्वय साधून हा प्रकल्प लवकरच कार्यान्वित केला जाईल, अशी माहिती अजित पवारांनी दिली. या निर्णयामुळे औद्योगिक क्षेत्रात काम करणारा तळेगाव आणि चाकण मधील रहिवाशांना मोठा फायदा होईल.