Pune News : पुणेकरांनो, तुम्ही जर उद्या कामानिमित्त घराबाहेर पडणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण पुणे शहरात सेनादिन संचलन कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची उपस्थिती असणार आहे. उद्या दिनांक 15 जानेवारीला हा कार्यक्रम लष्कराच्या दक्षिण मुख्यालयातर्फे आयोजित केला असून यासाठी शहरातील वाहतुकीमध्ये काही महत्त्वाचे बदल (Pune News) करण्यात आले आहेत. चंद्रमा चौक होळकर पुलादरम्यान सकाळी सात ते अकराच्या सुमारास वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत.
येथे वाहने लावण्यासाठी बंदी (Pune News)
वाहतूक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार आळंदी रस्ता चौक ते चंद्रमा चौक चंद्रमा चौक ते कोळकर कुलादरम्यान दुतर्फा वाहना लावण्यास बंदी घालण्यात आली आहे.
वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार ,आळंदी रस्ता चौक ते चंद्रमा चौक, चंद्रमा चौक ते होळकर पूल दरम्यान दुतर्फा सर्व प्रकारची वाहने लावण्यास बंदी घालण्यात आली आहे. खडकीतील हॅरिस पूल, नगर रस्त्यावरील खराडी बाह्यळण मार्ग, शास्त्रीनगर चौक, शादलबाबा चौक, विश्रांतवाडी चौकातून येरवड्याकडे जाणाऱ्या जड वाहनांना सकाळी सहा ते रात्री अकरापर्यंत बंदी (Pune News) घालण्यात आली आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे अमोल झेंडे यांनी केले आहे.
येरवड्यातील शादलबाबा चौक ते चंद्रमा चौकमार्गे खडकीकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. वाहनचालकांनी शादलबाबा चौक, डाॅ. आंबेडकर चौक, आळंदी चौक, विश्रांतवाडीतील साप्रस पोलीस चौकी, जुना होळकर पूलमार्गे इच्छितस्थळी जावे.
विश्रांतवाडीकडून होळकर पूलमार्गे खडकीकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. विश्रांतवाडी, (Pune News) साप्रस पोलीस चौकीमार्गे, जुना होळकर पूलमार्गे वाहनचालकांनी इच्छितस्थळी जावे.
बोपोडी चैाक, खडकी बाजार, चर्च चौक दरम्यान होळकर पूल, येरवड्याकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. वाहनचालकांनी पाटील इस्टेट, वाकडेवाडीमार्गे इच्छितस्थळी जावे.
जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावरुन अंडी उबवणी केंद्र (पोल्ट्री चौक) परिसरातील भुयारी मार्गातून मुळा (Pune News)रस्तामार्गे खडकी बाजारकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.