Pune News : आता शहराअंतर्गतही पुणेकर सुस्साट ! येरवडा -कात्रज भुयारी मार्गाला मान्यता

0
2
pune news
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Pune News : मुंबईनंतर राज्यातलं महत्त्वाचं शहर म्हणजे पुणे आहे. आता पुण्यामध्ये देखील आयटी इंडस्ट्री चांगल्या प्रकारे विकसित झाल्यामुळे पुण्याकडे येणाऱ्यांचा ओघ वाढला आहे आणि परिणामी रस्त्यावरील वाहनांची संख्या देखील वाढली आहे. त्यामुळे पुणेकरांना हल्ली वारंवार वाहतूक कोंडीला समोरे जावे लागते. यावर तोडगा काढण्यासाठी (Pune News) पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच पीएमआरडीए (PMRDA) यांच्याकडून येरवडा ते कात्रज असा २०किलोमीटर लांबीचा भुयारी मार्ग बांधला जाणार आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे 7500 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या मार्गात प्रत्येकी तीन मार्गिका असलेले दोन बोगदे असतील येरवडा ते कात्रज या मार्गावर तीन ते चार ठिकाणी भुयारी मार्गातून आत बाहेर जाण्यासाठी रस्ते असतील त्यामुळे शहरातील रस्त्यांवर येणारी लाखो वाहने जमिनीखालून प्रवास करू शकतील आणि शहरातील वाहतूक कोंडी कमी होईल असा दावा पीएमआरडीए ने केला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे झालेल्या पीएमआरडीए च्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली.

याबाबत माहिती देताना आयुक्त योगेश मसे यांनी सांगितलं की दिल्लीहून विमानाने पुण्यात येण्यासाठी दोन तास लागतात मात्र पुणे (Pune News) विमानतळावरून शहरातील वेगवेगळ्या भागात जाण्यासाठी आणखी दोन ते अडीच तास लागतात. याचं मुख्य कारण म्हणजे अपुऱ्या दळणवळणाच्या सुविधा सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अभाव आणि ठीक ठिकाणी होणारी वाहतूक कोंडी म्हणून भुयारी मार्ग उपयुक्त ठरेल असं पीएमआरडीएचे आयुक्त योगेश म्हसे यांनी सांगितलं.

या प्रस्तावाला आता मान्यता मिळाली असून सविस्तर आराखडा तयार करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत या मार्गावर अत्यंत कमी भूसंपादन करावं लागणार आहे तीन ते चार ठिकाणी भुयारी मार्गातून मुख्य रस्त्यावर येण्यासाठी अथवा मुख्य रस्त्यावरून भुयारी मार्गात प्रवेश करण्यासाठी आवश्यक जमिनीचे (Pune News) संपादन करावे लागणार आहे बाहेरील शहरातून पुढे शहरात येणाऱ्या तसेच कामानिमित्त शहराच्या एका टोकाहून दुसऱ्या टोकाला जाणारा नागरिकांसाठी हा उपयुक्त मार्ग ठरणार आहे वर्तुळाकार मार्ग उन्नत मार्गासोबतच आता जमिनीखालून रस्ते मार्ग तयार करण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला.