Pune News : पुण्यातील ‘या’ मार्गावर अवजड वाहनांसह पार्किंगला बंदी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Pune News : मुंबई नंतर राज्यातील विकसित शहरांमध्ये पुण्याचा क्रमांक लागतो. पुणे शहर सुद्धा झपाट्याने विकसित होत होत आहे. या शहरातील नागरिकांची संख्या देशील वाढली आहे. पर्यायाने वाहनांच्या संख्येत देखील वाढ झाली आहे. त्यामुळे वारंवार पुणे आणि आसपासच्या भागांना जोडणाऱ्या महत्वाच्या रस्त्यांवर नेहमी वाहतूक कोंडीची समस्या उद्भवते. पुणे वाहतूक (Pune News ) शाखेकडून यावर पर्याय शोधणे आणि तो आंमलात आणण्याचे काम सुरु आहे. त्याचाच एक भाग म्हणून पुणे नगर महामार्गासह इतर रस्त्यांवर जड वाहनांची वाहतूक आणि पार्किंग साठी पुणे वाहतूक शाखेकडून बंदी घालण्यात आली आहे.

जड वाहतुकीस बंदी (Pune News ) ही सकाळी सात ते दहा व सायंकाळी पाच ते नऊ या वेळेत असणार आहे. शिवाय यावर पाच मार्चपर्यंत नागरिकांकडून हरकती देखील मागवण्यात आल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार वाहतूक विभागाकडून हा प्रयोग तात्पुरत्या स्वरूपात करण्याचा आदेश काढण्यात आला आहे.

या आदेशानुसार पुणे नगर (Pune News ) महामार्गासह इतर रस्त्यांवर सर्व प्रकारच्या जड अवजड मंदगती वाहनांची वाहतूक तसेच पार्किंग करण्यास बंदी केल्याचे म्हंटले आहेअवजड वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो त्यामुळे नागरिकांना धोका निर्माण होऊन गैरसोय होऊ नये असे सर्व प्रकार टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान यावर पाच मार्चपर्यंत नागरिकांना हरकती नोंदविता येणार आहेत असं देखील नमूद करण्यात आला आहे

कोणत्या रस्त्यांवर असणार बंदी

वाहतूक शाखेकडून मिळालेल्या माहितीनुसार,पुणे नगर महामार्ग (Pune News ) , वाघोली वाघेश्वर चौक ते खराडी बायपास, वाघोली ते शिवाजी चौक केसनंद गाव, लोहगाव वाघोली रोड, वाघोली लोहगाव चौक ते लोहगाव ते धानोरी मार्गे विश्रांतवाडी, वाघेश्वर चौक, वाघोली ते लोणीकंद, लोहगाव ते पेट्रोल साठा चौक ते विश्रांतवाडी या मार्गांवर जड अवजड आणि मंदगती वाहतूक बंदी करण्यात आली आहे.

तसे पहायला गेल्यास पुणे नगर रोड हा वर्दळीचा रास्ता बनला आहे. मुंढव्याकडून खराडी ,वाघोलीला जाताना देखील नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. खराडी मध्ये ईयॉन आय टी पार्क असल्यामुळे नोकरीसाठी जाणाऱ्यांची येणाऱ्यांची संख्या ऑफिस टाइम मध्ये अधिक असते. शिवाय शाळेच्या बसेस देखील याच वेळेत येत असल्याने मोठी वाहतूक कोंडी या मार्गावर होते. त्यातच नगर रोडला जाणाऱ्या अवजड वाहनांची देखील गर्दी पाहायला मिळते.