ठरलं तर! ‘या’ दिवशी महाविकास आघाडीचं जागावाटप होणार; कोण किती जागा लढणार?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आगामी लोकसभा निवडणुका (Lok Sabha Election) तोंडावर आल्या आहेत. मात्र अद्याप महाविकास आघाडीच्या जागा वाटप करण्यात आलेली नाही. त्यामुळे ही जागा वाटपाची प्रक्रिया कधी निश्चित होईल याबाबत प्रश्न विचारले जात आहेत. याबाबतच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोठी माहिती दिली आहे. “येत्या 27 तारखेला पक्षाचे नेते आम्ही भेटणार आहेत. या 27 तारखेला उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) , नाना पटोले (Nana Patole) आणि शरद पवार (Sharad Pawar) एकत्र येऊन जागा वाटपाबद्दल माहिती देतील” असे संजय राऊत यांनी सांगितले आहे.

जागावाटपाच्या मुद्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, “उत्तर प्रदेशात काँग्रेस-सपामध्ये जागा वाटप पूर्ण झाल आहे. दिल्लीत आप – काँग्रेसमध्ये जागा वाटप होईल. तामिळनाडूत चर्चा शेवटच्या टप्प्यात आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि काँग्रेसमध्ये सकारात्मक चर्चा सुरु आहे. महाराष्ट्रात महा विकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस तिन्ही पक्षांमध्ये एक वाक्यता आहे. काहीही करुन भाजपाची हुकूमशाही पराभूत करायची हे आमच ठरलं आहे”

त्याचबरोबर शिवसेना किती जागांवर लढणारे याची माहिती देत संजय राऊत यांनी, “जागा वाटपासाठी महाविकास आघाडीचा कोणताही फॉर्म्युला नाही ठरला. ज्याची जिथे ताकत आहे, तिथे तो लढणार आहे. शिवसेना अखंड होती, तेव्हा शिवसेना-भाजपासोबत स्वाभिमानाने 23 जागांवर लढली. या वेळी सुद्धा 23 जागांवर लढू. आमची खरी शिवसेना आहे, लाचार नाही, फेकलेल्या तुकड्यांवर जगणारे नाही. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत” असे सांगितले.

पंतप्रधान मोदींवर टीका

दरम्यान, “भाजपाची जागा जिंकण्याची घोषणा म्हणजे लोकशाहीची थट्टा आहे. मोदींच्या खिशात 25 लाख किंमतीच पेन. भाजपाच्या नेत्यांकडे महागडी घड्याळ आहेत. आमचा बाप बाळासाहेब, पण भाजपाच्या बापाचा पत्ता आहे का? जनतेच्या लुटलेल्या पैशांवर मोदींच्या श्रीमंतीचा थाट. जनतेने ठरवलय भाजपाचे महागडे सूट उतरवायचे. भाजपाने निवडणुकीच्या तोंडावर ढोंग बंद कराव” अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींवर संजय राऊत यांनी केली आहे.