Pune News : मागच्या दोन-तीन दिवसांमध्ये पुणे विभागात जोरदार पाऊस पडत आहे. त्यातही पुण्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे नद्या दुधडी भरून वाहत असून भाटघर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. परिणामी नीरा (Pune News) नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार रविवारी (४) दुपारी भाटघर धरणाच्या जवळ असलेल्या सांगवी गुमा आणि हरताळी (तालुका खंडाळा जिल्हा सातारा) या गावांना जोडणाऱ्या पुलावरून पाणी वाहू लागल्यामुळे प्रशासनाने हा पूल वाहतुकीसाठी बंद केला आहे. त्यामुळे भोर-पुणे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे तुम्ही जर या मार्गावरून प्रवास करण्याचा विचार करीत असाल तर हा मार्ग बंद (Pune News) करण्यात आलेला आहे ही बाब लक्षात घ्या.
रविवारी सकाळी पुलाच्या दोन फूट खाली पाणी होते परंतु पावसाचा जोर अचानक वाढल्यामुळे पाण्याच्या पातळीमध्ये झपाट्यांने वाढ झाली. रविवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास पुलावरून पाणी वाहू लागले आणि याची माहिती मिळताच तहसीलदार सचिन पाटील यांनी पूल वाहतुकीसाठी बंद करण्याच्या सूचना दिल्या. पोलिसांनी व सांगवीच्या ग्रामस्थांनी लगेचच पुलाच्या दोन्ही बाजूंकडे बांबू लावून पूल (Pune News) वाहतुकीसाठी बंद केला.
काय आहे पर्यायी मार्ग ? (Pune News)
याबाबत माहिती देताना भोर येथील निवासी नायब तहसीलदार अरुण कदम यांनी सांगितले की, हरताळी येथील पुलावरून पाणी वाहू लागल्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे. भोर होऊन पुण्याला जाणारी वाहतूक ही भोर शिंदेवाडी सारोळा कापूरहोळ मार्गे(Pune News) वळवण्यात आली आहे.