Pune News : आज मंगळवार दिनांक २५ जून २०२४ रोजी अंगारकी संकष्टी चतुर्थी असल्यामुळे पुण्यातील शिवाजी रोड वरील श्रीमंत दगडूशेट हलवाई गणपतीला भाविकांची मोठी गर्दी होत असते. त्यामुळे या आणि आसपासच्या रस्त्यांवर ट्राफिक जॅम ची समस्या निर्मण होऊ शकते म्हणूनच पुणे वाहतूक शाखेच्या वतीने वाहतुकीत काही महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. हा बदल (Pune News) तात्पुरत्या स्वरूपाचा असणार आहे.
या रोड वरून पीएमपी बसेस, जड वाहन तसंच चार चाकी वाहनांना (Pune News) शिवाजी रस्त्यावर मंगळवारी गर्दी संपेपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. तसेच आवश्यकतेनुसार चार चाकी आणि दुचाकी वाहनांवर लाल महल चौकापासून निर्बंध घालण्यात आले आहेत, वाहतुकीची परिस्थिती पाहून वाहतूक वळवण्यात येणार आहे. या कालावधीत कोणत्या पर्यायांचा वापर करावा याची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी दिले आहेत.
काय असतील पर्यायी मार्ग (Pune News)
- पुरम चौकातून बाजीराव रस्त्यावरून शिवाजीनगर कडे जाणाऱ्या वाहन चालकांनी पुरम चौकातून टिळक रस्त्याने (Pune News) अलका टॉकीज चौक आणि पुढे इनामदार गोपाळ कृष्ण गोखले रस्त्याने इच्छित स्थळी जावे.
- शिवाजी रस्त्यावरून स्वारगेटला जाणाऱ्या वाहन चालकांनी स गो बर्वे चौकातून जंगली महाराज रस्त्याने (Pune News) खंडोजी बाबा चौक, टिळक चौकातून टिळक रस्त्यांना इच्छित स्थळी जावे.
- स गो बर्वे चौकातून पुणे मनपा भावनाकडे जाणाऱ्या वाहन चालकांनी सगो बरवे चौकातून जंगली महाराज रस्त्यांना झाशी राणी चौक डावीकडे वळून इच्छित स्थळी जावे.
- आप्पा बळवंत चौकातून बुधवार चौकाकडे जाणाऱ्या वाहन चालकांनी बाजीराव रस्त्याने (Pune News) सरळ पुढे इच्छित स्थळी जावे.