Pune News : पुण्यात देखावे पाहण्यासाठी बाहेर पडणार आहात ? मग ‘ही’ बातमी नक्की वाचा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Pune News : अवघ्या महाराष्ट्रात गणेशोत्सवाला धुमधडाक्यात सुरुवात झाली आहे. अनेकांच्या घरी बाप्पा विराजमान आहेत. त्यातही पुण्यामध्ये गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये विविध प्रकारचे देखावे केले जातात. हे देखावे पाहण्यासाठी पुणेकर आवर्जून गर्दी करीत असतात. नेमकी हीच बाब लक्षात घेऊन वाहतुकीसाठी अडथळा होऊ नये याकरिता शहराच्या मध्यवर्ती भागातील काही प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी सायंकाळी ५ वाजल्यानंतर बंद करण्यात येणार आहेत. जाणून घेऊया याबाबत (Pune News) अधिक माहिती …

उद्यापासून म्हणजेच दिनांक 11 सप्टेंबर पासून शहरातील काही मध्यवर्ती भागातील रस्ते सायंकाळी ५ वाजल्यानंतर बंद करण्यात येणार आहेत यामध्ये पुण्यातील लक्ष्मी रोड ,शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्ता, हा वाहतुकीस बंद केला जाणार आहे. वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असं आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात (Pune News) आले आहे.

गुरुवारपासून म्हणजेच 11 सप्टेंबर पासून शहराच्या मध्यवर्ती भागात गर्दी होण्याची शक्यता असल्याने वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. विसर्जन मिरवणुकींपर्यंत शहरातील वाहतूक व्यवस्थेत हे बदल करण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवेतील वाहन वगळता अन्य सर्व वाहनांसाठी सायंकाळी पाच नंतर मध्य भागातील प्रमुख रस्ते बंद ठेवण्यात येणार आहेत. (Pune News) गर्दी ओसरेपर्यंत मुख्य रस्ते बंद असतील. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असा आवाहन वाहतूक शालिकेचे पोलीस उपयुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे

‘हे’ रस्ते बंद (Pune News)

वाहतुकीस बंद असणारे रस्ते पुढीलप्रमाणे- लक्ष्मी रस्ता (हमजेखान चौक ते टिळक चौक), शिवाजी रस्ता (गाडगीळ पुतळा चौक ते देशभक्त केशवराव जेधे चौक, स्वारगेट), बाजीराव रस्ता (पूरम चौक ते अप्पा बळवंत चौक), टिळक रस्ता (मराठा चेंबर ऑफ काॅमर्स ते हिराबाग चौक)

वाहतुकीस बंद असणारे अंतर्गत रस्ते

सिंहगड गॅरेज (घोरपडे पेठ ते राष्ट्रभूषण चौक ते हिराबाग चौक), दिनकरराव जवळकर चौक ते पायगुडे चौक ते हिराबाग चौक, कै. अनंत बाळकृष्ण नाईक पथ ते टिळक रस्ता, सणस रस्ता (गोटीराम भैय्या चौक, मंडई ते गोविंद हलवाई चौक), पानघंटी चौक ते गंज पेठ पोलीस चौकी, गंज पेठ ते वीर लहुजी वस्ताद तालीम चौक, गायकसाब मशीद ते सेंटर स्ट्रीट पोलीस चौकी (लष्कर), कोहिनूर चौक ते बाबाजान चौक (लष्कर), जेधे प्रासाद रस्ता, सुभानशाह दर्गा, पार्श्वनाथ चौक, शास्त्री चौक ते सोन्या मारुती चौक, गुरुनानक पथ ते हमजेखान चौक (देवजीबाबा चौक, गणेश पेठ)

‘या’ भागात पार्किंग साठी मनाई (Pune News)

शिवाजी रस्त्यावरील जिजामाता चौक ते मंडई, , मंडई ते शनिपार, शनिपार ते फुटका बुरूज, अप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक या भागात वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे.