Pune News : पीएमपीच्या मेट्रो पूरकसेवेचा विस्तार; मेट्रोस्थानकापर्यंत लवकर पोहचता येणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Pune News : पुण्यामध्ये विविध मार्गांवर मेट्रो सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे पुण्याच्या प्रवाशांना काहीसा दिलासा मिळालेला आहे. मेट्रोमुळे पुणेकरांचा वेळही वाचतोय. तर दुसऱ्या बाजूला मेट्रोच्या स्थानकांपासून शहरातल्या इतर भागात जाण्यासाठी पीएमपी कडून सुविधा देखील पुरवण्यात येत आहेत. त्यामुळे वेळेत प्रवाशांना मेट्रोस्थानकात पोहोचता येत आहे. आता ही पीएमपीची सेवा आणखी सुरळीत होणार आहे कारण रामवाडी मेट्रो स्थानक ते येऊन आयटी पार्क या मेट्रो पूरक सेवेचा विस्तार करण्याचा निर्णय पीएमपी प्रशासनाने (Pune News) घेतला आहे.

पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये या सेवेला प्रारंभ झाला. यावेळी महा मेट्रोचे महाव्यवस्थापक कॅप्टन राजेंद्र समीर पाटील उपमहाव्यवस्थापक मनोज डॅनियल, पीएमपीचे मुख्य वाहतूक व्यवस्थापक सतीश गव्हाणे, वाहतूक नियोजन आणि संचलन अधिकारी नारायण करडे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित (Pune News) होते.

काय असेल वेळापत्रक? (Pune News)

या विस्तारित मार्गावरील पहिली सेवा सकाळी साडेसहा वाजता सुरू होणार आहे. तर शेवटची गाडी साडेसात वाजता असेल. या मार्गावर प्रत्येकी 14 -14 फेऱ्या होणार आहेत. खराडी येथील पहिली गाडी सकाळी सव्वा सात वाजता तर रात्री पावणे नऊ वाजता शेवटची गाडी (Pune News) सुटणार आहे.

कोणत्या स्थानकांचा समावेश ? (Pune News)

रामवाडी मेट्रोस्थानक, वडगाव शेरी फाटा, विमान नगर कॉर्नर, पाचवा माईल, टाटा गार्डन, चंदन नगर, खराडी, बायपास, जनक बाबा दर्गा, टाऊन डाऊन चौक, राघोजी चव्हाण चौक, वर्ल्ड ट्रेड सेंटर क्रमांक तीन आणि पाच ,गेट नंबर दोन ,इम्पेरियल अल्फा कॉम्प्लेक्स ,इंटरनॅशनल टिक पार्क असा या विस्तारित सेवेचा मार्ग असेल. या सेवेमुळे आयटी क्षेत्रातील कर्मचारी विद्यार्थी नोकरदार यांना मोठा लाभ (Pune News) होणार आहे.