Pune News: ठरलं तर मग ! सिंहगड रोडवरील उड्डाणपूल उद्या होणार खुला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Pune News: मुंबईनंतर राज्यातील सर्वात झपाट्याने विकसित होणाऱ्या पुणे शहराला सध्या वाहतूक कोंडीची मोठी समस्या भेडसावत आहे. मात्र आता पुणेकरांसाठी एक खुशखबर आहे. कारण सिंहगड रोडवरील उड्डाणपूलाचे अखेर उदघाटन होणार आहे. या पुलाच्या उद्घाटनासाठी अखेर मुहूर्त ठरला असून उद्या म्हणजेच 15 ऑगस्ट 2024 रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सकाळी सात वाजता या उड्डाण पुलाचे (Pune News) उद्घाटन होणार आहे.

दरम्यान मागच्या काही दिवसांपासून हा पूल तयार होता केवळ डांबराचा थर देणे बाकी होते. पुण्यामध्ये होणाऱ्या रस्त्यावरील वाहतूक कोंडी पाहता पूल का खुला केला जात नाही ? याबाबत पुणेकरांना टिकीची झोड उठवली होती. मात्र अखेर हा पूल आता सुरू होत असून पुणेकरांची वाहतूक कोंडी (Pune News) मधून सुटका होणार आहे.

सिंहगड रोडवरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी राजाराम पूल ते फन टाइम थिएटर दरम्यान उड्डाणपूल बांधला जात आहे. यामध्ये राजारामपुरी चौकातील उड्डाण पुलाचे काम पूर्ण झालं आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून पावसाची (Pune News) संततधार सुरू होती. खाडी ओली असल्याने डांबराचा प्लांट बंद होता. पावसात 50 किलोमीटरचा डांबराचा थर मारल्यास रस्ता लगेच खराब होऊन खड्डे पडू शकतात. म्हणून हे काम केले जात नव्हते. शनिवारी डांबरीकरण (Pune News) करण्यात आले.

दरम्यान, काम पूर्ण होऊनही उद्घाटना अभावी उड्डाणपूल सुरू झालेला नाही. उडडाणपुलावरून वाहतूक सुरू करावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. तरीदेखील उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला केला जात नव्हता. मात्र अखेर आता उड्डाणपुलाच्या उद्घाटनाचा मुहूर्त ठरला आहे. त्यामुळे या पुलाचे लवकरच उद्घाटन (Pune News) केले जाणार असून हा पूल वाहतुकीसाठी खुला केला जाईल