Pune News : पीएमपी मध्ये महिलांसाठी खास ‘तेजस्विनी’ गाड्या सुरु करण्यात आल्या आहेत. या गाड्यांमधून दररोज महिला प्रवास करीत असतात. मात्र पुण्यातील महिलांना याच गाड्यांमधून मोफत प्रवास करण्याची संधी पीएमपी (Pune News) कडून देण्यात आली आहे.
येत्या 8 मार्च रोजी जगभर जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या महिला दिनाच्या निमित्ताने पुणे महानगर (Pune News) परिवहन महामंडळाकडून महिलांसाठी मोफत सेवा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा मोफत (Pune News) प्रवास केवळ महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या बससाठी उपलब्ध असेल. त्यामुळे 8 मार्च रोजी शहरातील 17 मार्गांवर दिवसभर ही मोफत सेवा दिली जाणार आहे.
‘या’ बसेस चा समावेश (Pune News)
या मार्गावर महिला विशेष बस मधून मोफत सेवा देण्यात येणार आहेत. (Pune News) स्वारगेट ते हडपसर (301), स्वारगेट ते धारेश्वर मंदिर (117), शनिवार वाडा ते केशवनगर मुंढवा (369), कोथरूड डेपो ते पुणे स्टेशन (94), एनडीए गेट क्रमांक दहा ते मनपा (८२), कात्रज ते महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड (24), कात्रज ते कोथरूड डेपो (१०३), हडपसर ते वारजे माळवाडी (64), भेकराईनगर ते मनपा (111), हडपसर ते वाघोली (167), अप्पर डेपो ते शिवाजीनगर मार्केट यार्ड पिंपळे गुरव (११), पुणे स्टेशन ते कोंडवा खुर्द (170), आकुर्डी ते रेल्वे स्टेशन ते मनपा (132), निगडी ते मेगा पॉलिस हिंजवडी (372), भोसरी ते निगडी (367), चिखली ते डांगे चौक (355) या मार्गांचा यामध्ये समावेश असणार आहे.