Pune News : नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी मेट्रो मार्गाचे उदघाटन करण्यात आले. आता पुण्यातील आणखी एका मोठ्या प्रकल्पाचे उदघाटन मोदींच्या हस्ते होणार आहे. येत्या 10 मार्चला (Pune News) पुणे विमानतळावरील नविन टर्मिनलचे उदघाटन होणार आहे. खरेतर नवीन टर्मिनलचे काम पूर्ण होऊन अनेक महिने उलटले आहेत. हे टर्मिनल उदघाटनाच्या प्रतीक्षेत होते अखेर त्याला मुहूर्त मिळाला आहे. हे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
कधी सुरु होणार उड्डाणे ? (Pune News)
पुणे विमानतळाचे संचालक संतोष ढोके यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, पुणे (Pune News) विमानतळाच्या नवीन टर्मिनल्स उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 10 मार्चला दूरदृश्य प्रणाली द्वारे होईल. उद्घाटनानंतर चार ते सहा आठवडे नवीन टर्मिनल वर सुरक्षा चाचण्या होतील आणि त्यानंतर नवीन टर्मिनल वरून उड्डाणं सुरू होतील. 423 कोटी रुपये खर्चून बांधलेले नवीन टर्मिनल 51,595 चौरस मीटर क्षेत्र व्यापते आणि दरवर्षी 12 दशलक्ष प्रवाशांना हाताळू शकते.
मिळालेल्या माहितीनुसार पुणे विमानतळाच्या (Pune News) नवीन टर्मिनलचे उद्घाटन पंतप्रधान मोदींना सुरुवातीला होणार नव्हते, मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान कार्यालयाच्या (पीएमओ) भेटीदरम्यान चार नवीन मेट्रो स्टेशनसह टर्मिनलच्या उद्घाटनाचा समावेश केल्याचा खुलासा केला. त्यांतर नवीन टर्मिनलसह उदघाटन करण्याची विनंती केली होती.
इतरही नव्या टर्मिनलसचे उदघाटन (Pune News)
दरम्यान पुण्याशिवाय कोल्हापूर, ग्वाल्हेर, जबलपूर, अलिगढ, चित्रकूट, आझमगड, मुराबाद आणि आदमपूरसह विविध ठिकाणी नवीन विमानतळ टर्मिनलचे पंतप्रधान मोदी उद्घाटन करतील आणि नवीन कामांचे ऑनलाइन लोकार्पण करतील.