माझ्या वाट्याला कुणी गेल्यास मी त्याला सोडत नाही..; शरद पवारांचा शेळकेंना थेट इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज लोणावळ्यामध्ये होणाऱ्या शरद पवार गटाच्या कार्यकर्ता मेळाव्यात सहभागी होऊ नये, असे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे समर्थक सुनील शेळके (Sunil Shelke) यांनी म्हटले होते. यावर आता शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडून संताप व्यक्त करण्यात आला आहे. तसेच, “सुनील शेळके, तू आमदार कुणामुळे झालास हे विसरु नकोस, तुला ज्यामुळे चिन्ह मिळालं, त्या अर्जावर खाली माझी सही आहे. मला शरद पवार म्हणतात, माझ्या वाट्याला कुणी गेलं, तर मी त्याला सोडत नाही” असा थेट इशाराही दिला आहे.

शरद पवारांची टीका

लोणावळ्यामध्ये झालेल्या सभेत शरद पवार यांनी सुनील शेळकेंना धारेवर धरले. यावेळी बोलताना, “मला असे समजले की पदाधिकारी आणि कार्यकर्ते इथं येताय म्हणून त्याना धमकी देण्यात आली. मी त्यांना सांगू इच्छितो. सुनील शेळके तू आमदार कोणामुळं झाला, तुझ्या सभेला कोण आलं होतं. पक्षाचा अध्यक्ष कोण होतं? तुझ्या त्या अर्जावर माझी सही आहे, हे लक्षात ठेवा. यापुढं असं काही केलं तर मला शरद पवार म्हणतात, हे विसरू नका. मी त्या वाटेने जात नाही, पण गेलो तर मी कोणाला सोडत नाही” अशा शब्दात त्यांच्यावर घणाघाती प्रहार केला.

त्याचबरोबर, “लोकशाहीला संकटात नेहणारा कारभार मोदींकडून सुरू आहे. सामान्य माणसांचे अधिकार उध्वस्त होतील. त्यामुळं लोकशाही आणि घटनेचे संरक्षण करण्याची जबाबदारी आपली आहे. तुम्ही सर्वांना यात सहभागी व्हायला हवं. सत्तेचा गैरवापर भाजप करतं आहे. झारखंड, दिल्ली या राज्यात तेच घडतंय. नोटीस, समन्स द्यायचे आणि तुरुंगात टाकायचे. आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ही लवकरच अटक केली जाईल” अशी माहिती शरद पवार यांनी दिली.

सुनील शेळकेंचे प्रत्युत्तर

दरम्यान शरद पवार यांनी सुनील शेळके यांच्यावर टीका केल्यानंतर स्वतः यावर शेळके यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“शरद पवार यांच्या वक्तव्यामुळे वाईट वाटत आहे, त्यांनी कधीच वैयक्तिक टीका केली नाही. त्यांना खोटी माहिती देण्यात आली आहे. अजित पवार यांनी मला निधी दिला, माझ्या मागे उभे राहिले, त्यामुळे मी त्यांच्यासोबत का जाऊ नये? मी कोणत्याही कार्यकर्त्याला दमदाठी केलेली नाही. त्यामुळे मला पवार साहेबांच्या वक्तव्याचे वाईट वाटत आहे” असे सुनील शेळके यांनी म्हणले आहे.