Pune News : येत्या रविवारी म्हणजेच १४ जुलै रोजी पुणे विमानतळावरील नव्या टर्मिनलची सेवा सुरु करण्यात येणार आहे. याबाबतचा आढावा केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज (१२) घेतला. यानंतर त्यांनी ” हे टर्मिनल पुण्याच्या विकासाचे साक्षीदार आहे” अशी प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांच्यासोबत पुणे विमानतळाचे संचालक संतोष ढोके यांच्यासह विमानतळाच्या विविध विभागांचे (Pune News) अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना मोहोळ म्हणाले, केंद्र सरकारच्या माध्यमातून मोठा निधी गेल्या दहा वर्षांत पुणे शहराला मिळालाय . नवे टर्मिनल हे पुण्याच्या विकासाचे साक्षीदार असून, पुणे शहरातील हे विकासपर्व पुढेही सुरू राहील.
दरम्यान नवी टर्मिनल सुरू करण्यासाठी अतिरिक्त सीआयएसएफ जवानांची आवश्यकता होती. यासाठी केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन पाठपुरावा केला होता. त्याला तातडीने परवानगी देण्यात आली. न सीआयएसएफचे जवान पुणे (Pune News) विमानतळावर दाखल झाले आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नवीन टर्मिनलचे कामकाज सुरू (Pune News) करण्यासाठी आवश्यक असलेल्या अतिरिक्त 222 केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) कर्मचाऱ्यांना मंजुरी दिली आहे.यावर्षी मार्चमध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 423 कोटी रुपये खर्चून नव्याने बांधलेल्या 51,595 चौरस मीटर टर्मिनलचे लोकार्पण केले. तरीही, अधिक CISF कर्मचाऱ्यांची गरज पूर्ण झाली नव्हती , ज्यामुळे उदघाटन झाल्यानंतरही याची सेवा सुरु होण्यास विलंब विलंब झाला. मात्र आता अखेर याची सेवा सुरु होणार आहे.
टर्मिनल 2 च्या नवीन जोडणीमुळे या विमानतळाची प्रतिवर्षी सोळा दशलक्ष प्रवाशांना हाताळण्याची क्षमता (Pune News) असेल. एक देशांतर्गत उड्डाणांसाठी आणि दुसरी आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी.