Pune News : पुण्यात ओला,उबरची सेवा ‘या’ तारखेपासून बंद ; सुमारे 20 हजार कॅब चालक करणार आंदोलन

Pune News
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Pune News : पुणेकरांनो तुम्ही सुद्धा दररोज ऑफिसला ये-जा करण्यासाठी कॅब बुक करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. जिथे 20 फेब्रुवारीपासून पुणे (Pune News) शहरातील ओला आणि उबरची सेवा बंद असणार आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होऊ शकते.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की प्रादेशिक परिवहन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांनी कॅब कंपन्यांसाठी नवे दर पत्रक जाहीर केले आहे. हे नवीन दर 1 जानेवारी 2024 पासून लागू झाले आहेत. मात्र ओला आणि उबर यासारख्या कंपन्यांनी प्रत्यक्षात या दराची अद्याप अंमलबजावणी केलेली नाही यामुळेच (Pune News) कॅब चालकांना याचा मोठा फटका बसतो आहे.

नवीन दर लागू झाल्यास कॅब चालकांना मिळणाऱ्या कमिशनमध्ये वाढ होईल आणि वाढीव दराचा व्यवसायावर परिणाम होईल या शक्यतेमुळे कॅब (Pune News) सेवा देणाऱ्या कंपन्यांनी अद्याप नवीन दराची अंमलबजावणी केलेली नाही, हे नवीन दर लागू करण्यात यावेत या मागणीसाठी 20 फेब्रुवारीपासून पुणे आणि चिंचवड (Pune News) मधील कॅब चालकांकडून काम बंद आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. 20 तारखेपर्यंत हे दर लागू नाही झाले तर वीस तारखे नंतर ओला आणि उबेर ची कॅबची सेवा बंद राहणार आहे. त्यामुळे पुणे अंतर्गत प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होऊ शकते.

भाडेवाढ न करण्याच्या कंपन्यांच्या भूमिकेमुळे कॅब चालक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे येत्या 20 फेब्रुवारीपासून सकाळी 11 वाजता संगम ब्रिज जवळ आरटीओ (Pune News) कार्यालयासमोर चालक एकत्र येऊन आंदोलनाला सुरुवात करणार आहेत. या आंदोलनामध्ये जवळपास 20,000 कॅब चालक सहभागी होणार असल्याचा दावा करण्यात येतो आहे.