Pune News : पुणेकरांसाठी आता एक खुशखबर आहे. पुण्यातील रेल्वे स्टेशनचा पुनर्विकास केला जाणार आहे. याबाबतची माहिती खुद्द केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. मागील आठवड्याच्या शेवटी ते भाजपच्या एका मिटिंग साठी पुण्यातील बेलेवाडी येथे आले होते. शनिवारी (20) पुण्यातील रेल्वे स्थानकाला भेट देऊन पाहणी केली यावेळी त्यांनी पुणे रेल्वे स्टेशनचा पुनर्विकास (Pune News) करण्याबद्दल भाष्य केले.
यावेळी बोलताना वैष्णव म्हणाले, पुणे स्टेशन हे एकूण पुणे शहराच्या विकासासाठी महत्वाचे आहे. आम्ही त्याच्या पुनर्विकासाची योजना आखात आहोत. हे काम टप्प्या टप्प्यामध्ये केले जाईल. असे त्यांनी स्पष्ट केले. पुणे विभागाचे अधिकारी पुणे यार्डचे नूतनीकरण करण्याचे नियोजन करत होते, ज्यामध्ये प्लॅटफॉर्मच्या विस्ताराचाही समावेश होता. स्थानकावरील फलाटांची संख्या वाढवण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी अलीकडेच (Pune News) सांगितले. मात्र, निधीचे वाटप होऊनही यार्ड रिमॉडेलिंगची योजना सुरू झाली नव्हती. असे त्यांनी स्पष्ट केले.
पुणे-लोणावळा घाट विकास (Pune News)
पुणे-लोणावळा घाट आणि कसारा-इगतपुरी विभागाचा विकासही महत्त्वाचा असल्याचे वैष्णव म्हणाले. ते म्हणाले, “या विभागांवरील गाड्या उतार, तीव्र वळण आणि उंचीच्या आव्हानांमध्ये धावतात. घाट विभागांचा ग्रेडियंट कसा कमी करता येईल यावर निर्णय घेण्यात आला आहे. हे दोन्ही विभाग विकसित करण्याची योजना आहे जेणेकरून गाड्या सुरळीत धावू शकतील. हालचाल सुरक्षित असावी आणि प्रवाशांना सुरक्षित वाटले पाहिजे.
पुणे-नाशिक सेमी-हायस्पीड रेल्वे (Pune News)
पुणे रेल्वे स्थानकाच्या आजूबाजूला आणखी स्थानके विकसित करण्याची योजना सुरू असल्याचे मंत्री म्हणाले. वैष्णव म्हणाले की, पुणे-नाशिक सेमी-हायस्पीड रेल्वे प्रकल्पाशी संबंधित विविध विषयांवर राज्य सरकारशी चर्चा सुरू आहे. यासंबंधीच्या अडचणी लवकरच दूर केल्या जातील, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे लवकरच पुणे-नाशिक सेमी-हायस्पीड रेल्वे सुरु होण्याचा मार्ग मोकळा होण्याची (Pune News) शक्यता आहे.
160 वर्षानंतर पहिल्यांदाच मोठे घाट आणि 28 बोगदांना बायपास करण्यासाठी मुंबई आणि पुणे दरम्यान नवीन रेल्वे योजना गेल्या आठवड्याच्या शेवटी मंजूर झाली असल्याचं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मध्य रेल्वे विभागाला त्यावर जलद गतीने काम करण्यास सांगितलं असल्याची माहिती दिली त्याचबरोबर लोणावळा इथं थांबलेल्या तीन डब्यांच्या विशेष ट्रेनमध्ये त्यांनी प्रवास केला आणि घाटांवर निगेटिव्ह (Pune News) करण्याच्या प्रक्रियेची आणि बँकर लोको मोटिव च्या ऑपरेशनची तपासणी देखील केली.