सार्वजनिक वाहतुकीचे अभ्यासक सुजित पटवर्धन यांचे निधन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे : हॅलो महाराष्ट्र – सार्वजनिक वाहतुकीचे अभ्यासक आणि पर्यावरणवादी कार्यकर्ते सुजित पटवर्धन (sujit patwardhan) यांचे शनिवारी पहाटेच्या सुमारास निधन झाले आहे. त्यांच्या माघारी पत्नी,दोन मुली आणि नातवंडे असा परिवार आहे. ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. यानंतर त्यांना तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या ठिकाणी उपचारादरम्यान त्यांचा (sujit patwardhan) मृत्यू झाला.

सुजित पटवर्धन (sujit patwardhan) हे पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील सार्वजनिक वाहतूक सक्षम व्हावी यासाठी गेले वीस वर्षाहून अधिक काळ प्रयत्नशील होते. तसेच बीआरटी, पदपथ, सायकल ट्रॅक, हवेची गुणवत्ता, नदी सुधार हे त्यांच्या जिव्हाळ्याचे आणि अभ्यासाचे विषय होते.

सुजित पटवर्धन (sujit patwardhan) यांनी शहरातील पर्यावरणाचा समतोल राखला जावा यासाठी त्यांनी 1980 मध्ये परिसर या संस्थेची स्थापना केली होती. सुजित पटवर्धन हे प्रिंटिंगचे काम करत होते. प्रिंटिंग टेक्नॉलॉजीचा अभ्यास त्यांनी इंग्लंडमध्ये केला होता. तेथून परतल्यावर पुण्यात नारायण पेठेत त्यांनी ‘मुद्रा’ ही प्रिंटिंग प्रेस स्थापन केली होती.

हे पण वाचा :
बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार; प्रशांत किशोर यांचं भाकीत
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये फ्री मध्ये मिळवा Amazon Prime चे सब्सक्रिप्शन !!!
‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत केदार दिघेंचं मोठं विधान; म्हणाले कि…
Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!
दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय