Pune Railway | पुणेकरांसाठी खुशखबर ! ‘या’ शहरासाठी सुरू होणार खास एक्सप्रेस ट्रेन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Pune Railway | आपल्या देशातील कितीतरी लोक दररोज रेल्वेने प्रवास करत असतात. आता रेल्वेने प्रवास करणाऱ्या सगळ्या प्रवाशांसाठी एक मोठी बातमी समोर आलेली आहे. जे लोक पुण्याहून खानदेशाकडे जातात किंवा खानदेशाहून पुण्यात येतात. त्यांच्यासाठी ही बातमी खूप खास असणार आहे. खानदेशमधील अनेक लोक हे पुण्यामध्ये शिक्षण, नोकरी आणि उद्योगधंद्याच्या निमित्ताने स्थलांतरित झालेले आहे. त्याचप्रमाणे दररोज अनेक नागरिक रेल्वेने (Pune Railway ) पुण्याहून खानदेशला प्रवास करत असतात.

हा पल्ला गाठण्यासाठी अनेक लोक हे रेल्वेने (Pune Railway ) प्रवास करत असतात. यामुळे पुणे ते भुसावळ या दरम्यान एक वेगळी रेल्वे सुरू करावी अशी मागणी गेलेअनेक दिवसांपासून येत होती. भुसावळ आणि खानदेशातील रेल्वे प्रवाशांसाठी हुतात्मा एक्सप्रेस फायद्याची होती. परंतु ही एक्सप्रेस विदर्भातील अमरावती येथून सोडली जात आहे. त्यामुळे भुसावळ येथून थेट पुण्यासाठी स्वतंत्र एक्सप्रेस सुरू करावी, अशी मागणी रेल्वे प्रवाशांकडून आली होती.

अशातच आता प्रवाशांच्या मागणीवर एक चांगला निर्णय घेतला जाणार आहे, अशी लक्षणे देखील दिसत आहे. हाती आलेल्या माहितीनुसार या मागणीच्या प्रस्तावाचा रेल्वे मुख्यालयाकडे पाठवण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे प्रवाशांची गैरसोय होऊ नये, म्हणून पुणे ते भुसावळ या दरम्यान एक स्वतंत्र एक्सप्रेस ट्रेन असा प्रस्ताव देखील मांडण्यात आलेला आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यास लगेच एक्सप्रेस ट्रेन धावणार आहे.

आता जिल्ह्यातील अनेक लोकांनी केंद्रीय स्तरावर याबाबतचा पाठपुरावा सुरू केलेला आहे. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी नुकतेच केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव आणि यांची दिल्लीमध्ये भेट घेतलेली आहे. या मध्ये पुणे ते भुसावळ या दरम्यान स्वतंत्र रेल्वे (Pune Railway ) सुरू करावी याची मागणी देखील केली आहे. जर या मागणीचा सकारात्मक विचार झाला, तर लवकरच पुणेकरांसाठी पुणे ते भुसावळ ही एक स्वतंत्र रेल्वे चालू होणार आहे.