Pune Real Estate : मागच्या काही वर्षात रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये सर्वाधिक वाढ झाल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्राचा विचार करता मुंबई मध्ये घरांची किंमत सर्वात जास्त आहे. मात्र त्या पाठोपाठ पुण्यात सुद्धा घरांच्या किंमतीत सर्वात जास्त वाढ झाली आहे. पुण्यामध्ये घरांच्या मागणीतही वाढ झाली आहे. आयटी सिटी म्हणून ओळख असलेल्या पुण्यात आलिशान घरांना मागणी आहे. शहराचा पसारा आणि जागेंचे दर हे सातत्याने वाढताना दिसत आहेत. सध्या पुण्यामध्ये घर घ्यायच झाल्यास त्याची किंमत 50 लाख ते 1 कोटींच्या आसपास आहे. अशातच पुण्यामधील एक मोठी प्रॉपर्टी डील सध्या चर्चेचा विषय बनली आहे. पुण्याच्या इतिहासातील ही सर्वात महागडी डील ठरली आहे. पुण्यामध्ये तब्बल 37 कोटींना (Pune Real Estate) एक पेंट हाऊस विकलं गेलं आहे. चला जाणून घेउया या डील बाबत अधिक माहिती…
आता पुण्यामध्ये हे पेंट हाऊस कुठे आहे? तर हे पेंट हाऊस बंद गार्डन येथील ‘लोढा वन’ येथे आहे. हे पेंट हाऊस 12000 स्क्वेअर फुटांचे आहे आणि रेरा मध्ये नोंदणी नुसार या पेंट हाऊसची प्रती स्क्वेअर फुट किंमत ही 28 हजार ते 29 हजार रुपये अशी मोजण्यात आलेली आहे. हे पेंट हाउस तब्बल 37 कोटींना विकलं गेलं आहे. बांधकाम व्यवसायिक क्षेत्रात मोठे नाव असलेल्या लोढा बिल्डर्स साठी (Pune Real Estate) मार्कोटेक डेव्हलपर्स च्या माध्यमातून या घराची विक्री करण्यात आल्याची माहिती आहे.
पुण्याच्या इतिहासातील सर्वात मोठी डील (Pune Real Estate)
तसे पाहायला गेल्यास मिळालेल्या माहितीनुसार दोन वर्षांमध्ये म्हणजे एप्रिल 2022 ते आतापर्यंत पुण्यामध्ये अशा प्रकारची एकूण 32 घरं विक्री केली गेली आहेत ज्या घरांची किंमत दहा कोटींपेक्षा अधिक होती. याबाबतची माहिती त्यांच्या करारनाम्यावर दिली गेली होती. पुण्याच्या इतिहासात आतापर्यंत सर्वात महागड्या घराची किंमत ही 18.5 कोटी रुपये इतकी होती. आता हा विक्रम मोडला असून नोंदणी नंतर रेरानुसार लोढा वन बंड गार्डन येथील पेंट हाऊस साठी प्रतिस्केअर फुट 28 हजार ते 29 हजार रुपयांचा दर मोजण्यात आला असून या प्रॉपर्टीची विक्री ही 37 कोटी रुपयांना झाली आहे. कंपनीने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रिकात म्हटलं आहे की या स्तरावरील प्रॉपर्टीचा (Pune Real Estate) हा सर्वाधिक दर आहे. 37 कोटींच्या या पेंट हाऊसला ‘एम्परर पॅलेस’ असं नाव देण्यात आला आहे.
कोणत्या सुविधा? (Pune Real Estate)
पुण्यामध्ये असणारी जमिनीची कमतरता आणि लक्झरीस घरांची मागणी या दोन्ही बाबी लक्षात घेता लोढानं बंडगार्डन इथं लक्झुरिअस प्रोजेक्ट आणला आहे. यामध्ये अनेक लक्झरी सुविधा देखील देण्यात आलया आहेत. खाजगी टेरेस, स्विमिंग पूल देखील देण्यात (Pune Real Estate) आले आहेत. तसेच लोढाचे खाजगी हॉस्पिटलिटी सर्विस देखील या प्रोजेक्टमध्ये देण्यात आली आहे.
लोढा वन हा पुण्यातील सर्वात लक्झरीस प्रॉपर्टी पैकी एक आहे. लोढा वन हा पुण्यातील कॅम्प परिसरामधील सर्वात उंच असा टॉवर आहे. विशेष म्हणजे या प्रोजेक्टमध्ये 150 वर्षे जुनी दोन महाकाय वडाचे झाड देखील (Pune Real Estate) आहेत.