Pune-Shirur Elevated Road : पुणे – शिरूर या 53 किमीच्या मार्गाचे अद्ययावतीकरण करण्यास राज्य सरकारची मान्यता

pune shirur road
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Pune-Shirur Elevated Road : राज्यभरात वाहतुक मार्गाचे जाळे अधिक मजबूत करण्याकडे भर दिला जातो आहे. यासाठी समृद्धी महामार्ग , शक्तीपीठ महामार्ग , कोस्टल रोड यासारखे महत्वाचे रस्ते प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. त्यातही समृद्धी महामार्गाचे काम आता अखेरच्या टप्प्यात आले असून लवकरच हा मार्ग पूर्णपणे खुला केला जाणार (Pune-Shirur Elevated Road) आहे. या मार्गाबाबतची एक महत्वाची अपडेट हाती आली आहे. चला जाणून घेऊया…

पुणे ते शिरूर रोड हा ५३ किमीचा एलिव्हेटेड सहापदरी मार्ग छत्रपती संभाजीनगरमार्गे बाळासाहेब ठाकरे समृद्धी द्रुतगती महामार्गाला जोडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. प्रस्तावित एक्स्प्रेस वेची सुरुवात केसनांद (वाघोली) आणि लोणीकंद येथील पुणे बायपास रोडपासून होणार आहे. पुणे ते शिरूर या ५३ किलोमीटर लांबीच्या मार्गाचे सहा टप्प्यात अद्ययावत करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. प्रस्तावित एक्स्प्रेस वे केसनांद आणि लोणीकंद येथील पुणे बायपासपासून सुरू होईल, छत्रपती संभाजीनगर ओलांडून हा मार्ग समृद्धी द्रुतगती मार्गाला जोडला (Pune-Shirur Elevated Road) जाईल.

MSIDC द्वारे होणार कार्यान्वित (Pune-Shirur Elevated Road)

हा प्रकल्प सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) आणि महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ (MSIDC) द्वारे कार्यान्वित केला जाईल. याबाबत माहिती देताना PWD च्या आधिकाऱ्यांनी माध्यमांना सांगितले की, “मार्च 2024 मध्ये स्वाक्षरी केलेल्या सामंजस्य करारानुसार, PWD आणि महाराष्ट्र सरकार दोन वर्षांत प्रकल्प सुरू होईल याची खात्री करण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना सुरू करतील, त्यात अयशस्वी झाल्यास रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय ( MORTH) सार्वजनिक हितासाठी संपूर्ण प्रकल्प ताब्यात घेण्याचा विचार करू शकते.

एकूण मार्गासाठी 9,565 कोटी रुपयांना मंजुरी (Pune-Shirur Elevated Road)

गुरूवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अहमदनगर ते छत्रपती संभाजीनगर या राष्ट्रीय महामार्गाचे अपग्रेडेशन करण्याचा निर्णय घेण्यात आला. MSIDC द्वारे राबविल्या जाणाऱ्या या प्रकल्पासाठी पुणे-शिरूर रोडसाठी 7,515 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे आणि अहमदनगर बायपास मार्गे छत्रपती संभाजीनगर रस्ता सुधारण्यासाठी अतिरिक्त 2,050 कोटी रुपयांना मंजुरी देण्यात आली आहे. महामार्गाची एकूण किंमत 9,565 कोटी रुपये इतकी आहे.

या भागातील वाहतूक कोंडी होणार दूर

सध्याच्या घडीला नगर रोडला वाहनधारकांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. मात्र या उन्नत मार्गामुळे येरवडा, खराडी, वाघोली, लोणीकंद, शिक्रापूर आणि शिरूर यांसारख्या भागातील वाहतूक कोंडी लक्षणीयरीत्या कमी होईल आणि वाघोली आणि पुणे दरम्यानचा प्रवास वेळ कमी होईल.

काय आहेत वैशिष्ट्ये ? (Pune-Shirur Elevated Road)

  • नवीन पुणे-शिरूर-अहमदनगर-छत्रपती संभाजीनगर ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस वे सध्याच्या पुणे-नगर-छत्रपती संभाजीनगर रोडला समांतर असेल .
  • हा एक्सप्रेसवे सहापदरी असेल.
  • या मार्गामुळे शिरूर, अहमदनगर, नेवासा, देवगड, पैठण आणि छत्रपती संभाजीनगर या शहरांना अधिकृत प्रवेश आणि बाहेर जाण्याचा मार्ग मिळेल.
  • या एक्स्प्रेस वेची एकूण लांबी अंदाजे 250 किमी असेल.
  • PWD ने शिरूर ते अहमदनगर मार्गावरील टोलवसुली पूर्ण केल्यानंतर, तो MSIDC कडे हस्तांतरित केला जाईल.
  • त्याचप्रमाणे देवगड ते छत्रपती संभाजीनगर मार्गावरील टोलवसुली पूर्ण झाल्यानंतर तो सुधारणेसाठी (Pune-Shirur Elevated Road) एमएसआयडीसीकडे वर्ग केला जाईल.