Pune Temperature: फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यात उन्हाचा चटका वाढला असून, पुणे शहर देशातील सर्वाधिक तापलेल्या शहरांमध्ये अग्रस्थानी पोहोचले आहे. शहराचे सरासरी तापमान 35 अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे.गेल्या काही दिवसांत पहाटेचा गारवा सोडल्यास यंदा पुण्यात थंडी फारशी जाणवली नाही. गेल्या 48 तासांत पुण्यात कमाल तापमान 37°C नोंदवले गेले. (Temperature Update Pune)
कोरेगाव पार्कमध्ये राज्यातील उच्चांकी तापमानाची नोंद
1 फेब्रुवारीला कोरेगाव पार्कचे कमाल तापमान 31.5°C होते. 9 फेब्रुवारीला: ते वाढून तब्बल 37°C वर गेले.हवामान विभागाच्या अहवालानुसार, पुण्यातील तापमान वाढ राज्यभरातील सर्वाधिक असून, सोलापूर, वर्धा, अकोला, अमरावती आणि बुलढाणा या शहरांनाही उष्णतेचा मोठा फटका (Pune Temperature) बसला आहे.
वाढत्या तापमानाचा नागरिकांवर परिणाम
फेब्रुवारीतच एप्रिलसारखी उष्णता जाणवते. उन्हाच्या झळा अंगाला चटका लावत असल्याचे नागरिक सांगत आहेत.गेल्या काही दिवसांत पुण्यातील कमाल आणि किमान तापमान सातत्याने चढे राहिले आहे. जानेवारीत थंडी कमी राहिली राज्यात नोव्हेंबर ते जानेवारी दरम्यान अपेक्षेपेक्षा कमी थंडीची नोंद झाली.
25 ते 31 डिसेंबर काही दिवस तीव्र थंडी जाणवली.त्यानंतर ढगाळ हवामान आणि उत्तरेतील थंडीची लाट कमी झाल्याने तापमानात (Pune Temperature) चढउतार झाले. फेब्रुवारीत कोरडे वारे आणि शुष्क हवामानामुळे उष्णतेच्या झळा वाढल्या आहेत.
मागील 48 तासांतील तापमानवाढीची नोंद
सोलापूर, वर्धा, अकोला, अमरावती, बुलढाणा आणि पुणे याठिकाणी तापमान झपाट्याने वाढले आहे.कोरेगाव पार्क येथे सर्वाधिक 37°C तापमान नोंदवले गेले.
हवामानतज्ज्ञांच्या मते, प्रदूषण आणि शहरीकरणामुळे पुण्यात तापमान वाढीचा वेग अधिक असल्याचे दिसत आहे. पुणे शहराचा वाढता पारा आणि उन्हाचा तडाखा पाहता, फेब्रुवारी नंतर उन्हाळा किती तीव्र होईल, याची कल्पना करता येते




