देशभरात मोठमोठे रस्ते प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. छोट्या शहरांना मोठ्या शहरांशी जोडण्यासाठी रस्त्यांची मोठी महत्वाची भूमिका आहे. परिणामी उद्योग व्यापाराला चालना मिळणार आहे. राज्यातील दुसरे महत्वाचे शहर म्हणून पुणे शहराचं नाव घेतलं जातं. आता पुण्याची कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी रस्त्यांचे जाळे अधिक मजबूत करण्यात येत आहेत. याच्या अंतर्गत पुणे ते छत्रपती संभाजीनगर हा मार्ग केवळ दोन तासांत पार करता येणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक विकास मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमादरम्यान बोलताना ही माहिती दिली आहे.
कधी होणार रस्त्याच्या कामांना सुरुवात ?
गडकरी यांनी सांगितल्याप्रमाणे डिसेंबर अखेरपर्यंत पुणे जिल्ह्यातील विविध रस्ते प्रकल्पांच्या कामांना सुरुवात होणार आहे. यामध्ये पुण्यातील अनेक कामांचा समावेश असणार आहे. पालखी महामार्गसमवेत विविध रस्त्यांची कामे अन नद्यांवरील पुलांची जवळपास दीड हजार कोटी रुपयांची कामे डिसेंबर अखेरपर्यंत सुरू होणार अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली आहे.यासोबतच गडकरी यांनी पुणे रिंग रोड प्रकल्प, एलिव्हेटेड रोड, मुंबई-बेंगलोर, नाशिक रस्ता, पुणे छत्रपती संभाजी नगर रस्ता या कामांच्या निविदा प्रक्रिया सुद्धा अंतिम झाल्या असल्याची माहिती दिली आहे.
पुण्यातून केवळ 2 तासांत संभाजीनगर
प्रस्तावित मार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर पुणे आणि संभाजीनगर या दोंन्ही शहरांमधील अंतर कमी होणार असून कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. शिवाय हा मार्ग दोन्ही शहरातल्या औद्योगिक, शेती, आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून सुद्धा महत्वपूर्ण ठरणार आहे.त्यामुळे साहजीकच या दोन्ही शहरातल्या अर्थकारणावर याचा परिणाम होणारआहे.