हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नवीन वर्षाच्या सुरुवातीला अनेक लोक फिरण्याचा प्लॅन करत असतात. हे येणारे नववर्ष साजरे करण्यासाठी हजारो प्रवासी पुण्यातून कोकणाचा रस्ता धरताना दिसतात. पण अनेकदा गाडी अभावी त्यांचे नियोजन फसते. यासाठी काही दिवसांपूर्वी अनेक प्रवाशांनी रेल्वे विभागाकडे विशेष रेल्वेची मागणी केली होती. याचीच दखल रेल्वे प्रशासनाने घेतली असून , अशा प्रवाशांसाठी त्यांनी पुणे ते करमाळी दरम्यान विशेष एक्सप्रेस गाडी चालवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे अनेक प्रवाशांना मोठी खुशखबर मिळाली आहे.
पुणे-करमाळी विशेष एक्सप्रेस –
नाताळच्या सुट्या आणि नवीन वर्ष बघता रेल्वेने ही विशेष गाडी 25 डिसेंबर, 1 जानेवारी आणि 8 जानेवारीला पुण्याहून सुटणार असल्याचे सांगितले आहे , यामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. पुणे-करमाळी विशेष एक्सप्रेस (गाडी क्रमांक 01407) दर बुधवाराला प्रवास करणार आहे. हि गाडी पुण्याहून सकाळी 5.10 वाजता सुटणार आहे , आणि ती करमाळी स्थानकावर रात्री 8.25 वाजता पोहचणार आहे . त्यामुळे या दिवशी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आरामदायक आणि सुबक प्रवास अनुभवण्याची संधी उपलब्ध होणार आहे .
करमाळी-पुणे विशेष एक्सप्रेस –
करमाळी-पुणे विशेष एक्सप्रेस दर बुधवाराला प्रवास करणार आहे . या गाडीचा प्रारंभ करमाळी स्थानकावर रात्री 10.00 वाजता होणार असून , ती दुसऱ्या दिवशी दुपारी 1.00 वाजता पुणे स्थानकावर पोहचणार आहे . प्रामुख्याने हि गाडी , 25 डिसेंबर, 1 जानेवारी आणि 8 जानेवारी रोजी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी उपलब्ध असणार आहे . या गाडीच्या सेवेमुळे प्रवाशांना रात्रीच्या वेळेस आरामदायक आणि सोयीस्कर प्रवासाची संधी मिळणार आहे , जी त्यांना पुणे येथे वेळेवर पोहोचवणार आहे.
प्रमुख स्थानकांवर थांबणार –
ही गाडी पुणे आणि करमाळी दरम्यान चिंचवड, तळेगाव, लोणावळा, कल्याण, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिवी या प्रमुख स्थानकांवर थांबणार आहे. त्यामुळे प्रवाशांना अनेक पर्याय उपलब्ध होणार आहेत.
आनंददायी प्रवासाचा अनुभव घेता येणार –
नाताळ व नववर्षाच्या सुट्टीत कोकण व गोव्याला जाणाऱ्यांसाठी ही गाडी खूप उपयुक्त ठरणार आहे. तिकीट बुकिंग लवकरात लवकर करून आपला प्रवास निश्चित करणे आवश्यक आहे. रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे पुणे आणि कोकण यांच्यातील प्रवास आणखी सोयीस्कर व आरामदायक होणार आहे. त्यामुळे नववर्ष साजरे करण्याच्या उत्साही वातावरणात पुणेकरांना आनंददायी प्रवासाचा अनुभव घेता येणार आहे.