Pune Tourism : लोहगडावर पर्यटक अडकले; पावसाचा आनंद घेण्यासाठी गेलेले पुणेकर Frustrate होऊन आले, नक्की काय घडलं?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन झालं असून सर्वत्र पावसाच्या सऱ्या कोसळत आहेत. पावसाळ्यात मनसोक्त निसर्गाचा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक वेगवेगळ्या ठिकाणी जात असतात. त्याच पद्धतीने पुणे शहरापासून (Pune Tourism) जवळपास 70 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या लोहगड किल्ल्यावर काल पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. मात्र किल्ल्याच्या महादरवाजामध्येच तब्बल 4 तास अडकून पडल्याने पर्यटकांचा मोठा हिरमोड झाला आहे.

रविवार हा सुट्टीचा दिवस असल्याने पर्यटकांची पाऊले हे लोहगडाकडे वळली. विकेंड असल्याने सकाळी लोहगड किल्यावर मोठ्या प्रमाणात पर्यटकांनी गर्दी केली. त्यामुळे सकाळी गेलेले पर्यटक आणि 3 ते 4 च्या सुमारास खालून जाणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढल्याचे पाहायला मिळालं. जेवढे पर्यटक वर जात होते तितकेच खालीही येत होते. त्यामुळे मोठी गर्दी झाली. प्रवाशांना ताटकळत उभं राहावे लागले. याबाबतचे विडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झालेत.

लोहगडावर काय आहे खास? (Pune Tourism)

दरम्यान, पुणेकरांसाठी जवळचं असलेल्या लोहगड किल्ल्यावर खास करून पावसाळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. गडाची स्थिती अतिशय चांगली असून सुरक्षतेच्या दृष्टीनेही हा किल्ला ट्रेक करणं अतिशय योग्य आहे. लोहगडावर विंचुकडा, उलटा धबधबा, हनुमान दरवाजा, गणेश दरवाजा, नारायण दरवाजा, महादरवाजा अशी पाहण्यासारखी ठिकाणे आहेत. लोहगड किल्ल्यावरून पवना धरणाची उत्कृष्ट दृश्ये, निसर्ग सौंदर्याचा खराखुरा अनुभव घेता येतो. त्यामुळे विकेंडला पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते.