पुणेकरांनो ! मेट्रोच्या कामामुळे वाहतुकीत बदल, बाहेर पडण्यापूर्वी एकदा पहाच

pune traffic
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

राज्यातील दुसरे महत्त्वाचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात पायाभूत विकास कामे केली जात आहेत. रिंग रोड आणि मेट्रो प्रकल्प ही दोन महत्त्वाची प्रकल्प सध्या पुण्यामध्ये सध्या राबवली जात आहेत. पुण्यातील मेट्रो आता आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजेवाडी पर्यंत धावणार आहे त्यामुळेच वाहतुकीमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे तुम्ही जर पुण्यामध्ये प्रवास करणार असाल तर वाहतुकीचे पर्यायी रस्ते कोणते आहेत कोणता मार्ग बंद आहे या सर्वांशी माहिती घेऊनच बाहेर पडा चला जाणून घेऊयात वाहतुकीतील बदल…

गणेशखिंड रोडवरील पुणे विद्यापीठ चौक ते शिवाजीनगर न्यायालयादरम्यान टाटा मेट्रोचे काम सुरू आहे. वाहतूक सुरक्षित व सुरळीतपणे सुरू राहण्याकरीता पुणे शहरातील वाहतुकीत तात्पुरत्या स्वरुपात बदल करण्यात आला आहे. यासंदर्भातील आदेश शहर वाहतूक शाखेचे उपआयुक्त अमोल झेंडे यांनी काढले आहे.

असे असतील वाहतुकीतील बदल

बाणेरकडून येणारी वाहतूक औध रोडवर वळवून राजभवन समोरील पंक्चरमधून युटर्न घेवून पुन्हा विद्यापीठ मार्गे शिवाजीनगर इच्छितस्थळी जातील.

शिवाजीनगरकडून औंधकडे जाणारी वाहतूक ही पुणे विद्यापीठ चौकातून सरळ औंधरोड मार्गे इच्छितस्थळी जातील.

औंधकडून शिवाजीनगरकडे जाणारी वाहतूक ही मिलेनियम गेट चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनच्या गेटमधून पुणे विद्यापीठ परिसर-उजवीकडे वळून-वाय जंक्शन- विदयापीठ मुख्य प्रवेशव्दारातून बाहेरपडून इच्छितस्थळी जातील.