Pune : मुंबई खालोखाल राज्यामध्ये पुणे शहराचा नंबर लागतो. राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक शिक्षण , नोकरी आणि कामानिमित्त पुण्यात येत असतात. तर काही कामानिमित्त आलेले लोक पुण्यातच स्थायिक झाले आहेत. याचा परिणाम मात्र पुण्याच्या लोकसंख्येत झाला असून पुण्याची लोकसंख्या तर वाढली आहेच शिवाय पुण्यामध्ये वाहनांची संख्या देखील वाढली असून पुण्यातल्या काही मार्गावर तासंतास वाहतूक कोंडी होते. शहरातील हीच समस्या लक्षात घेऊन RTO कडून एक खास उपाययोजना राबवण्यात येणार आहे. येत्या २१ सप्टेंबर पासून ही ट्राफिक समस्या नियंत्रण (Pune) योजना लागू केली जाणार असून त्यासाठी शहरातलया वाहतूक व्यवस्थेत काही बदल देखील केले जाणार आहेत.
शहरातील 32 अत्यंत गर्दीच्या रस्त्याची नोंद (Pune)
वाहतूक नियंत्रणासाठी शहरातील 32 अत्यंत गर्दीच्या रस्त्याची नोंद केली गेली असून यावर काही विशेष बदल करत या अत्यंत वर्दळीच्या आणि नेहमी ट्रॅफिक जाम होणाऱ्या भागांमध्ये काही बदल केले जाणार आहेत. वाहतूक कोंडीची समस्या कमी करण्यासाठी आणि प्रवासांचा वेळ वाचवण्यासाठी ट्रॅफिक पोलीस आणि बीएमसीना काही उपाययोजनांची एक मालिका तयार केली आहे. यामध्ये रस्त्याचे रुंदीकरण, बिल बोर्डस आणि इलेक्ट्रिकल पोल्स सारखे अडथळे हटवणे, ड्रेनेज दुरुस्ती, खड्ड्यांची दुरुस्ती, ट्रॅफिक सिग्नलची देखभाल आणि सुधारित चौरस व्यवस्थापनाचा समावेश असणार आहे. शिवाय ट्राफिक नियंत्रण उपकरण आणि विभाजन तंत्राचा वापर गुगलच्या मदतीने केला जाणार आहे. त्यामुळे ट्राफिकचं (Pune) व्यवस्थापन करणं प्रभावी होणार आहे.
‘या’ रस्त्यांचा समावेश (Pune)
वाहतूक नियंत्रणाच्या या पहिल्या टप्प्यामध्ये अहमदनगर रोड, नॉर्थ मेन रोड (कोरेगाव पार्क) आणि सोलापूर रोड इथं अमलात आणला जाणार आहे. तर फातिमानगर, वानवडी आणि काळुबाई या मुख्य चौकांवर ट्रॅफिक वळणांचा प्रभाव राहील आणि पर्यायी मार्ग दिले जाणार आहेत. तर अहमदनगर रोड चौकावर चौरस रस्ते बंद केले जाणार आहेत आणि अग्निबाण आणि सोमनाथ नगर चौकावर यू टर्न लागू केले जाणार आहे. ज्यामुळे वाहतुकीचे नियोजन होईल असे (Pune) महापालिकेचे मत आहे.
ही नवी योजना गणेश खिंड (पुणे विश्वविद्यालय) रोडवरील ट्राफिक व्यवस्थापना सारखेच कार्य करणार आहे. तसेच नवले पूल, राधा चौक आणि आंबेडकर चौक वर एक ट्राफिक योजना तयार केली गेली आहे. या उपाययोजनांचा उद्देश शहरातले ट्रॅफिक सुधारण्याचा आहे