हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Pune Traffic । पुणे पुस्तक महोत्सव 2025 च्या आयोजनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक सुरळीत राहावी आणि नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी वाहतूक विभागाकडून रस्ते वाहतुकिसंदर्भात काही बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार, पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय (एफ सी) रोड आजपासून ९ दिवस म्हणजेच २१ डिसेंबर पर्यंत बंद असणार आहे. अशावेळी एफ.सी रोडवरून न जाता, पर्यायी रस्ता मार्ग वापरण्याचे आवाहन पोलिसांनी केलं आहे.
फर्ग्युसन कॉलेज मैदानावर दि. 13 ते 21 डिसेंबर दरम्यान होणाऱ्या या भव्य पुस्तक महोत्सवासाठी दररोज हजारो नागरिक, विद्यार्थी, वाचक आणि साहित्यप्रेमींची उपस्थिती अपेक्षित आहे. या पुस्तक महोत्सवाला विद्यार्थी, व्हीव्हीआयपी, नागरिक मिळून ७ ते ८ लोक जमण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे, साहजिकच यामुळे फर्ग्युसन कॉलेज रस्ता, जंगली महाराज रस्ता तसेच आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन हे बदल लागू करण्यात आले आहेत. पुस्तक महोत्सव काळात सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत जंगली महाराज रस्ता आणि फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावर काही वेळा वाहतूक नियंत्रण व आवश्यकतेनुसार वाहने वळवण्याची तरतूद करण्यात आली आहे. Pune Traffic
5 महत्त्वाचे बदल- Pune Traffic
- जंगली महाराज रोडने कर्वे रोड करीता बालगंधर्व डावी कडे वळून, नदीपात्र रोडने, महादेव मंदीर येथून इच्छित स्थळी जावावे
- कर्वेरोड कडून एफ. सी. कॉलेज रोडने शिवाजीनगर च्या दिशेने जाण्याकरीता कर्वे रोड नळस्टॉप, लॉ कॉलेज रोडने, सेनापती बापट रोडने इच्छित स्थळी जावा
- पुस्तक महोत्सव करीता येणाऱ्या नागरीकांसाठी एफ.सी. कॉलेज गेट नं. 3 संत तुकाराम महाराज पादुका चौक येथून दुचाकी चारचाकी / बस इत्यादी वाहनांना एफ. सी. कॉलेज मधील पार्किंग ग्राऊंड करीता प्रवेश देण्यात येणार आहे.
- पुस्तक महोत्सव करीता येणाऱ्या नागरिकांनी बाहेर जाण्याकरीता एफ. सी. कॉलेज गेट नं. 4 चा वापर करावा.
- पुस्तक महोत्सव करीता येणाऱ्या नागरीकांनी फक्त पायी जाण्यासाठी एफ.सी. कॉलेज गेट नं. 2 चा वापर करावा.




