Pune Train : खुशखबर ! पुणे – अमरावती मार्गावर धावणार द्वि-साप्ताहिक ट्रेन

pune train
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Pune Train : राज्यात मुंबई नंतर पुणे हे मोठे शहर आहे. आता तर पुण्यामध्ये IT सेक्टर मोठ्या प्रमाणात विकसित झाल्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातून पुणे शहरात नोकरी धंद्याच्या निमित्ताने येणाऱ्यांची कमी नाही. पुण्यामध्ये (Pune Train) दळणवळणासाठी मुख्य साधनांपैकी एक म्हणून रेल्वे वाहतुकीचा उपयोग केला जातो. पुण्यात रेल्वेने विविध राज्यातून तसेच आसपासच्या शहरांमधून येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या कमी नाही. हीच बाब लक्षात घेऊन पुण्याची कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्या दृष्टीने रेल्वे विभागाने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पुणे ते अमरावती दरम्यान दोन साप्ताहिक नवीन ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

पुणे ते अमरावती (Pune Train) दरम्यान प्रवाशांची संख्या लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आल्याचं बोललं जात आहे. आता या गाड्यांचे वेळापत्रक काय असेल ? चला जाणून घेऊया. या गाडीत एकूण 17 ICF डबे असतील यामध्ये एक फर्स्ट एसी, एक एसी-2 टियर, दोन एसी-3 टियर, 5 स्लीपर क्लास, 8 जनरल सेकंड क्लाससह 2 लगेज कम गार्डची ब्रेक व्हॅन लगेज ब्रेक व्हॅन यांचा समावेश आहे.

गाडी क्रमांक 11405 पुणे- अमरावती (Pune Train) द्वि-साप्ताहिक एक्स्प्रेस 10.03.2024 पासून दर शुक्रवारी आणि सोमवारी 22.45 वाजता पुण्याहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 17.30 वाजता अमरावतीला पोहोचेल.

गाडी क्रमांक 11406 अमरावती – पुणे द्वि-साप्ताहिक एक्स्प्रेस अमरावती येथून दर शनिवारी आणि सोमवारी 19.50 वाजता 09.03.2024 पासून सुटेल आणि पुण्याला दुसऱ्या दिवशी 16.25 वाजता पोहोचेल.

‘या’ स्थानकांचा समावेश (Pune Train)

पुणे ते अमरावती दरम्यान उरुळी, केडगाव, दौंड, जिंती रोड, जेऊर, कुर्डूवाडी, बार्शी टाऊन, उस्मानाबाद, लातूर, लातूर रोड, परळी वैजनाथ, परभणी, पूर्णा, बसमत, हिंगोली डेक्कन, वाशीम, अकोला, मूर्तिजापूर आणि बडनेरा. या स्थानकांचा समावेश असेल.

येथे करा ऑनलाईन बुकिंग

तुम्हाला ट्रेन क्रमांक 11405/11406 साठी बुकिंग करायचे (Pune Train) असल्यास 9 मार्चपासून तुम्ही बुकिंग करू शकता. यासाठी www.irctc.co.in वेबसाइटवर जाऊन आरक्षण करता येईल.