विशेष प्रतिनिधी । दिनांक 2-12-2019 रोजी बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणि ससून सर्वोपचार रुग्णालय पुणे तर्फे चालवल्या जाणाऱ्या सेंटरमध्ये जागतिक एड्स दिन साजरा करण्यात आला. आजारासंबंधी जनतेमध्ये जनजागृतीच्या उद्देशाने सामूहिक प्रभातफेरी काढण्यात आली , तसेच एड्स बाधित रुग्णांशी भेदभाव न करण्यासाठीची शपथ घेऊन मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले होते .
त्यानंतर नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आजारासंबंधी पथनाट्य सादर केले . या पथनाट्यमध्ये संदीप हेगडेवार अनिता बिडवे गणेश रणदिवे , धर्मा कांबळे यांनी सहभाग घेतला . तसेच विहान आणि मानव्य या स्वयंसेवी संस्थांनी ससून सर्वोपचार रुग्णालयातील एड्सबाधित रुग्णांच्या समोर पथनाट्य सादर केली . या कार्यक्रमाच्या निमित्ताने रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती . बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणि ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या एआरटी सेंटर येथे समुपदेशन तपासणी आणि औषध वाटप यामध्ये सुसूत्रता यावी म्हणून कोकण सिस्टिमचे उद्घाटन अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच एचआयव्ही बाधित रुग्णांना प्रवास सवलतीसाठीच्या प्रमाणपत्राचे वाटप या कार्यक्रमात करण्यात आले.
या कार्यक्रमास डॉ. अजय चंदनवाले , डॉ. राजेश कार्यकर्ते , डॉ. अजय तावरे , डॉ. हरीश पाटील आदींसह आधीसेविका ,एआरटी सेंटरचे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गिरवलकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.