पुणेकर क्रिकेटप्रेमींसाठी खुशखबर!! वर्ल्डकप सामने पाहण्यासाठी गहुंजेला थेट बस सेवा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | देशात सध्या ICC विश्वचषक स्पर्धा (World Cup 2023) मोठ्या जोशात सुरु आहे. भारतात क्रिकेट हा खेळ एखाद्या धर्मासारखा असल्याने वर्ल्डकपच्या निमित्ताने क्रिकेट चाहत्यांमध्ये मोठ्या आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झालं आहे. त्यातच आता पुणेकर क्रिकेटप्रेमींसाठी मोठी खुशखबर आहे. यंदा पुण्यातील गहुंजे येथील स्टेडियमवर (Gahunje Stadium) विश्वचषक स्पर्धेचे काही सामने होणार असून क्रिकेट मॅच बघण्यासाठी जाणाऱ्या प्रेक्षकांसाठी PMPML तर्फे गहुंजेला विशेष बसेस सोडण्यात येणार आहेत.

पुण्यात होणार ५ सामने –

विश्वचषक स्पर्धेत पुण्यातील गहुंजे क्रिकेट मैदानावर ५ सामने होणार आहेत. यातील ४ सामने हे दिवस- रात्र असणार असून १ सामना दिवसा असणार आहे. त्यामुळे सामना बघायला जाणाऱ्या क्रिकेट चाहत्यांची गैरसोय होऊ नये म्हणून PMPML ने विशेष बस सोडण्याची घोषणा केली आहे. पुण्यातून मनपा भवन, निगडी टिळक चौक बस स्टॅंड आणि कात्रज बायपास येथून या बसेस सोडण्यात येणार आहेत. बसचा तिकीट दर मनपा भवन व निगडी येथून प्रतिव्यक्ती 100 रुपये इतका असणार आहे. गरज पडल्यास अधिक बस सोडण्यात येणार आहेत.

कसे असतील सामने?

पुणे मधील क्रिकेट मैदानात 19 व 30 ऑक्टोबर आणि 1 आणि 8 नोव्हेंबर यादिवशी होणाऱ्या डे -नाईट सामन्यांसाठी मनपा भवन येथून सकाळी 11:00, 11:35, 12:05  यावेळेला बस सुटतील. तर, कात्रज बायपास येथून सकाळी 11:00 आणि 11:30 वाजता बस सुटेल. तर, निगडी टिळक चौकातून दुपारी 12:00 आणि 12:30  वाजता बस सोडण्यात येणार आहेत. 11 नोव्हेंबर रोजी दिवसा होणाऱ्या सामन्यांसाठी मनपा भवन येथून सकाळी 8:25, 8:50 , 9:05 या वेळेत तीन बस सोडण्यात येणार आहेत. तर, कात्रज बायपास येथून सकाळी 8:15 व 8:35 या दोन बस असतील. निगडी टिळक चौकातून सकाळी 8:30 व 9:00 वाजता बस सोडण्यात येणार आहेत.