Pune : पुण्यामध्ये पावसाने काल आणि आज अशी थोडी उसंत घेतली आहे. मात्र मागच्या काही दिवसात वरून कोसळणारा पाऊस , रस्त्यावरील खड्डे , मेट्रोची कामे याने प्रचंड वाहतूक कोंडीला पुणेकरांना सामोरे जावे लागत आहे. मात्र वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी पुणे शहर (Pune) वाहतूक पोलिसांनी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. येत्या 12 ऑगस्ट पर्यंत शहरातल्या प्रमुख ३० ठिकाणांवर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. चला याबाबत अधिक जाणून घेऊया…
पुणे पोलिसांकडून शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांवर होणाऱ्या वाहतूक कोंडीवर उपाय करण्यासाठी रविवारी एक अधिसूचना जाहीर करण्यात आली. यामध्ये शहरातील 30 ठिकाणी सकाळी नऊ ते रात्री दहा वाजेपर्यंत अवजड वाहनांना बंदी लागू करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण उपाययोजना म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. हा (Pune) निर्णय दिनांक 5 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट या काळापर्यंत असणार आहे.
आपत्कालीन सेवा देणाऱ्या वाहनांना सूट (Pune)
याबाबतचा निर्णय रविवारी रात्री डीसीपी ट्राफिक रोहिदास पवार यांनी जाहीर केला. या निर्णयानुसार अवजड वाहनांवरील बंदीचा नियम हा ट्रक डंपर्स काँक्रीट मिक्सर आणि इतर अवजड वाहनांना लागू राहणार आहे. असे असले तरी पोलिसांनी जाहीर केलेल्या पत्रकानुसार आपातकालीन सेवांमध्ये सहभागी वाहनांना या नियमातून सूट देण्यात आल्याचं स्पष्ट करण्यात आलं (Pune) आहे.
‘या’ ठिकाणांचा समावेश
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील संचेती चौक, पौडफाटा चौक, राजाराम पूल, दांडेकर पूल, निलायम पूल, सावरकर पुतळा चौक, लक्ष्मीनारायण सिनेमा चौक, सेवन लव्ह चौक, खणे मारुती चौक, पावर हाऊस चौक, आरटीओ चौक, पाटील इस्टेट चौक, ब्रेमन चौक, शास्त्रीनगर, आंबेडकर चौक, चंद्रमा चौक, मुंढवा चौक, नोबेल चौक, लुल्ला नगर ते गोळीबार मैदान, लुल्ला नगर ते गंगाधाम पुष्पा मंगल चौक, राजस सोसायटी, पोल्ट्री चौक, उंड्री ,पिसोळी, हांडेवाडी ,अभिमनाश्रे बाणेर आणि अभिमनाश्रे पाषाण या ठिकाणी सकाळी नऊ ते रात्री दहा या वेळेत अवजड (Pune) वाहनांना प्रवेश बंदी असेल.