देशातील या बँकांवर RBI ची दंडात्मक कारवाई; ग्राहकांना पैसे काढण्यास अडचण?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये बँक अतिशय महत्त्वाचा भाग बनली आहे. परंतु देशातील पाच बडा बँकांवर RBI ने म्हणजेच रिझर्व बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank Of India) मोठी कारवाई केली आहे. त्यामुळे या बँकांमधून खातेधारकांना पैसे काढता येतील की नाही? असा प्रश्न विचारला जात आहे. तर , ही कारवाई आरबीआयकडून का करण्यात आली आहे? याबाबत विचारणा केली जात आहे. याचेच उत्तर आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.

गेल्या काही दिवसांमध्ये आरबीआयने देशातील अनेक महत्वाच्या बँकांवर दंडात्मक कारवाई (Punitive Action) केली आहे. एवढेच करून न थांबता आता मध्यवर्ती बँकेने या बँकांचे लायसन रद्द केले आहे. ही कारवाई दोन्ही बँकांनी बँकेची आर्थिक स्थिती डबघाईला आल्यामुळे केली आहे. ठेवीदारांच्या आर्थिक सुरक्षिततेचा विचार करून काही बँकांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. तर ज्या बँका दिवाळखोर झाल्या आहेत त्यांचे लायसन रद्द केले गेले आहे. यामुळेच ग्राहकांमध्ये ही चिंतेचे वातावरण पसरले आहे.

कोणत्या बँकांवर कारवाई?

नागरिक सहकारी बँक (राजकोट)
द कांगडा को-ऑपरेटिव्ह बँक (नवी दिल्ली)
नगर सहकारी बँक (लखनऊ)
जिल्हा सहकारी बँक (उत्तराखंड)
जिल्हा सहकारी बँक (देहरादून)

अशा महत्त्वाच्या बँकांवर आरबीआयने कारवाई केली आहे. तर राजकोट नागरिक सहकारी बँकेला 43.30 लाख रुपयांचा दंड भरण्यास सांगितले आहे. याबरोबर, आणखीन तीन बँकांना प्रत्येकी 5 लाख रुपये भरण्याचे आदेश आरबीआयने दिले आहेत. तर, देहरादून येथील जिल्हा सहकारी बँकेला दोन लाख रुपयांचा दंड भरण्याचे आदेश दिले आहेत. परंतु बँकांवर ही कारवाई करण्यात आली असली तरी त्याचा परिणाम ग्राहकांवर होणार नाही. कारण या सर्व बँकांचे व्यवहार आधी सारखेच सुरू राहणार आहेत. फक्त नियमांचे उल्लंघन केल्यामुळे या बँकांना दंड भरण्यास सांगितले आहे.