Pushpa 2 Teaser : ‘पायात घुंगरु, हातात त्रिशूल, डोळ्यात काजळ अन..’; अर्धनारी ‘पुष्पा 2’चा दमदार टिझर आउट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Pushpa 2 Teaser) साउथ सिने विश्वाचा स्टायलिश हिरो अर्थात सुपरस्टार अल्लू अर्जुन हा कायमच त्याच्या चित्रपटांमुळे आणि त्याच्या दमदार अंदाजामुळे चर्चेत असतो. अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा- द राईज’ हा चित्रपट केवळ दक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीत नव्हे तर बॉलिवूड सिनेविश्वातसुद्धा भारी गाजला होता. यानंतर आता त्याचे चाहते ‘पुष्पा २’ च्या प्रतीक्षेत आहेत. अशातच अल्लू अर्जुनच्या वाढदिवशी अर्थात आज ‘पुष्पा २’ चा धमाकेदार असा टिझर रिलीज करण्यात आला आहे. या टीझरमध्ये अल्लू अर्जुनचा एक अलग अंदाज पहायला मिळतोय. त्यामुळे सिनेमाबाबत आणखीच उत्सुकता वाढत आहे.

‘पुष्पा – द राईज’ हा चित्रपट २०२१ मध्ये रिलीज झाल्यानंतर अल्लू अर्जुनच्या कामाचा प्रेक्षकांवर आणि समीक्षकांवर विशेष प्रभाव पडला होता. त्यामुळे ‘पुष्पा’ चा पुढील भाग अर्थात ‘पुष्पा २’ कधी रिलीज होणार? याबाबत कायम चर्चा राहीली. पुष्पा या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. त्यामुळे आता ‘पुष्पा २’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज होण्याची सगळेच प्रतीक्षा करत आहेत.

आज अल्लू अर्जुन त्याचा ४२ वा वाढदिवस साजरा करत असताना त्याच्या ‘पुष्पा २ – द रुल‘ (Pushpa 2 Teaser) सिनेमाचा टिझर रिलीज करण्यात आला आहे. प्रेक्षकांना रिटर्न गिफ्ट मिळाल्याचा आनंद झाला आहे. टिझर रिलीजआधी एक पोस्टर शेअर करण्यात आलं होतं. ज्यात अल्लू अर्जुनच्या हातात कुऱ्हाड होती आणि तो हटके स्टाईलमध्ये सिंहासनावर बसलेला दिसला. त्यानंतर टीजरने मात्र प्रेक्षकांच्या उत्सुकतेला आणखी उधाण आणलं आहे.

टीझरमध्ये काय आहे? (Pushpa 2 Teaser)

अभिनेता अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा २ – द रूल’ हा चित्रपट घोषणेपासूनच चर्चेत आहे. शिवाय पोस्टर रिलीजनंतर पुष्पाचा अलग अवतार सगळ्यांच्याच उत्सुकतेचं कारण ठरला. अशातच आता टीझर रिलीजनंतर प्रेक्षकांमध्ये रिलीज बाबत विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे. कारण यामध्ये प्रेक्षकांचा लक्ष वेधून घेईल असा पुष्पाचा एक नवा अवतार पाहायला मिळतोय. त्याच्या पायात घुंगरू, हातात त्रिशूल आणि डोळ्यात अंगार आहेत.

Pushpa 2 The Rule Teaser | Allu Arjun | Sukumar | Rashmika Mandanna | Fahadh Faasil | DSP

(Pushpa 2 Teaser) महत्वाचं म्हणजे, पुष्पाचा अर्धनारी अवतार सिनेमात काहीतरी विशेष आणि हटके पहायला मिळणार हे स्पष्ट करत आहे. पुष्पाचा हा ॲक्शन अवतार ‘फ्लावर नाही फायर है’ या डायलॉगला अगदी साजेसा आहे. टीझरमध्ये अल्लू अर्जुनच्या हातात त्रिशूल आणि शंख आहे. ते घेऊन तांडव करताना फायटिंग सिन सुरु असल्याचे दिसत आहे. ०

कधी रिलीज होणार?

अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा – द रूल’ हा चित्रपट कधी रिलीज होणार? याबाबत गेल्या अनेक महिन्यांपासून वेगवेगळ्या चर्चा पहायला मिळाल्यानंतर अखेर आता हा चित्रपट १५ ऑगस्ट २०२४ रोजी रिलीज होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या चित्रपटाचे बजेट ५०० कोटी असून रिलीजनंतर हा सिनेमा दुप्पट कमाई करेल अशी आशा आहे. (Pushpa 2 Teaser) या चित्रपटात अल्लू अर्जुनसोबत नॅशनल क्रश अभिनेत्री रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर फहद फासील हा खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.